suresh raina joins defending champions deccan gladiators in abu dhabi t10 league vbm 97 | Loksatta

सुरेश रैना क्रिकेटच्या मैदानात परतणार, ‘या’ लीगमध्ये आंद्रे रसेल आणि डेव्हिड विसेसोबत खेळणार

सुरेश रैना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करत आहे. तो अबू धाबी येथील एका स्पर्धेत सहभागी होत आहे

सुरेश रैना क्रिकेटच्या मैदानात परतणार, ‘या’ लीगमध्ये आंद्रे रसेल आणि डेव्हिड विसेसोबत खेळणार
संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करत आहे. तो टी-१० स्पर्धेत मध्ये सामील झाला आहे. अबू धाबी टी-१० लीगच्या सहाव्या हंगामामध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सचे प्रतिनिधित्व करेल. मंगळवारी एका निवेदनात लीगचे आयोजकांनी ही माहिती दिली. सुरेश रैना एडीटी १० मध्ये पहिला हंगाम खेळणार आहे. रैना डेक्कन ग्लॅडिएटर्स संघात सामील होईल आणि आंद्रे रसेल, तस्किन अहमद, जोश लिटल आणि डेव्हिड विसे यांच्यासोबत खेळेल.

चार वेळा प्रतिष्ठित आयपीएल ट्रॉफीचा विजेता, रैनाने लीगमध्ये ५५२८ धावा केल्या आहेत आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. २०१६-१७ मध्ये गुजरात लायन्सचे कर्णधारपद भूषवले आहे, त्यांच्यासाठीही खूप धावा केल्या आहेत. मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रैनाने स्पर्धेच्या इतिहासात सीएसके फ्रँचायझीसाठी फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा देखील महत्त्वाचा भाग होता. रैनाने २२६ वनडे सामन्यांमध्ये ५६१५ आणि टी-२० मध्ये १६०५ धावा केल्या आहेत.

सुरेश रैना आपल्या नवीन इनिंगबद्धल बोलताना म्हणाला, “डेक्कन ग्लॅडिएटर्समध्ये सामील होण्यासाठी मी उत्साही आहे. यावर्षी विजेतेपद राखण्यात सक्षम होण्यासाठी उत्सुक आहे.” मी या नवीन आव्हानाची वाट पाहत आहे. ही एक रोमांचक स्पर्धा असणार आहे आणि मी त्याचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

हेही वाचा – T20 World Cup 2022 : मॅक्स आणि टॉम कूपरच्या भागीदारीच्या जोरावर नेदरलॅंड्सचा झिम्बाब्वेवर ५ विकेट्सने विजय

अबू धाबी टी-१० स्पर्धचे सीओओ राजीव खन्ना म्हणाले, “सुरेश रैनाला अबू धाबी टी-१० च्या रोस्टरमध्ये समाविष्ट करणे ही चांगली बातमी आहे. तो केवळ त्याच्या अविश्वसनीय क्रिकेट क्षमता आणि प्रतिभेने स्पर्धेत योगदान देत नाही, तर त्याच्या सहकाऱ्यांना अनुभव आणि ज्ञानाचा खजिना देखील देतो. अबू धाबी टी-१० च्या सहाव्या हंगामात त्याच्या सहभागाने निश्चितपणे अधिक चाहत्यांना आकर्षित करेल.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-11-2022 at 15:38 IST
Next Story
Ind vs Ban: …अन् त्या शॉटबरोबरच विराटने अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला; यापूर्वी कोणालाही जमली नाही ही कामगिरी