IND vs SA Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen : भारतीय संघाने डर्बन येथील पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात संजू सॅमसनने शतकी खेळी साकारत भारतीय संघाला २०२ धावांचा डोंगर उभारुन देण्यात महत्त्वाची बजावली. यानंतर आपल्या धावंसख्येचा बचाव करताना वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई या भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. दरम्यान या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मार्को यान्सन यांच्यात वादावादी झाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वास्तविक, दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १५व्या षटकात मोठे नाट्य पाहायला मिळाले. हे षटक रवी बिश्नोईने टाकत होता आणि त्याच्या दुसऱ्या चेंडूवर गेराल्ड गोएत्झीने एक धाव घेतली. त्यानंतर अर्शदीप सिंगने चेंडू पकडला आणि तो यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या दिशेने फेकला. हा थ्रो पकडण्यासाठी संजू खेळपट्टीच्या दिशेने पोहोचला होता, त्यानंतर आफ्रिकन खेळाडू मार्को जॅन्सनला कदाचित हे आवडले नाही, ज्यामुळे तो संजू सॅमसनला काही तरी म्हणाला आणि येथून वादाची ठिणगी पडली.

IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?

यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने यष्टिरक्षक संजूच्या बचावात मार्को यान्सनशी बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली, त्यानंतर अंपायरही त्यांच्याकडे धावत आले. आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या

संजू सॅमसनने शतक झळकावत केला मोठा पराक्रम –

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय संघाला अभिषेक शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. मात्र, यानंतर संजू सॅमसनने तुफानी खेळी करत पहिल्यांदा अवघ्या २७ चेंडूत आणि अर्धशतक आणि ४७ चेंडूत आपले सलग दुसरे टी-२० शतक पूर्ण करत इतिहास घडवला. तो भारतासाठी सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर ही कामगिरी करणारा जगातील चौथा फलंदाजा ठरला आहे. त्याने ५० चेंडूचा सामना करताना ५० चेंडूत ७ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १०७ धावांची झुंजार खेळी साकारली. ज्यामुळे भारतीय संघाला २०२ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले.

हेही वाचा – कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत

भारतीय गोलंदाजांनी केला कहर –

दक्षिण आफ्रिका संघ सुरुवातीपासूनच २०३ धावांचा पाठलाग करतना मोठी भागीदारी रचण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत होता. यजमान संघाच्या ४४ धावांपर्यंत ३ विकेट्स पडल्या होत्या. त्यानंतर धावसंख्या ९३ धावांपर्यंत पोहोचली तोपर्यंत आफ्रिकेचे ७ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. परिस्थिती अशी होती की दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या १० षटकांत १२५ धावा करायच्या होत्या, मात्र मधल्या षटकांमध्ये वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांच्या घातक गोलंदाजीमुळे टीम इंडियाला सामना जिंकण्यात यश आले. या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, त्याशिवाय आवेश खाननेही दोन आणि अर्शदीप सिंगने एक विकेट घेतली.

Story img Loader