Suryakumar Yadav Dance on Dhurandhar Fa9la Song Video: आयपीएल २०२६ ची मुंबई इंडियन्ससाठी धमाकेदार सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. आपल्या ३६०-डिग्री फलंदाजी शैलीसाठी ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव सध्या त्याच्या फलंदाजीमुळे नव्हे, तर त्याच्या डान्स मूव्ह्समुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, सूर्यकुमार यादव ‘धुरंधर’ चित्रपटातील प्रसिद्ध पात्र ‘रेहमान डकैत’ स्टाईल फासला गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सूर्यकुमार यादवने खचाखच भरलेल्या प्रेक्षकांसमोर ‘धुरंधर’ चित्रपटातील प्रसिद्ध डान्स स्टेपने चाहत्यांचं लक्ष वेधलं. धुरंधरमधील व्हायरल झालेल्या फासला गाण्यावर सूर्यादादा फेमस मुव्ह्स करताना दिसत आहे. सूर्याचा डान्स पाहून चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तर स्टेजवरील सर्वच जण सूर्यादादाचा रेहमान डकैत अवतार पाहून हसत त्याचं कौतुक करत होते.

सूर्या दादाचा रेहमान डकैत अवतार! व्हीडिओ पाहिलात का?

सूर्याचा सध्याचा फॉर्मही उत्कृष्ट आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने आठ चेंडूंमध्ये १६ धावांची वेगवान आणि आक्रमक खेळी केली. तीन चौकारांनी सजलेल्या या खेळीने मुंबईला विजय मिळवून दिला. सूर्याच्या फटक्यांमध्ये तीच धार आणि ताकद दिसून आली. सूर्यादादा पहिल्याच सामन्यात दुखापतीमुळे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फक्त फलंदाजीला उतरला होता.

दरम्यान, सूर्याची मजेशीर शैली चाहत्यांमध्ये अधिकच लोकप्रिय होत आहे. सूर्याच्या एन्ट्रीला फासला गाणं सुरू होताच तो डान्स करतच स्टेजवर पोहोचला. धुरंधर चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय, या चित्रपटाचे दोन्ही पार्टला चाहत्यांनी फारच पसंती दिली. या व्हायरल गाण्यामुळेही ‘धुरंधर’ चित्रपटाची लोकप्रियता वाढली. आयपीएलमधील अनेक संघांतील खेळाडू दाखल होताना या चित्रपटातील अनेक डायलॉग सीन वापरले आहेत.

धुरंधर द रिव्हेंज या दुसऱ्या पार्टमधील प्रसिद्ध डायलॉग ‘घर की याद नही आयी तुझे जस्सी’ यावर जसप्रीत बुमराहचा वेलकम व्हीडिओ तयार करण्यात आला. संघाचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा डायलॉग बुमराहला पाहून बोलताना दिसत आहे आणि त्यावर बुमराह मागे वळून पाहत एक भन्नाट व्हीडिओ मुंबई इंडियन्सने शेअर केला होता. हा व्हीडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता.