Suryakumar Yadav dances To Akshaye Khanna’s FA9LA song : आदित्य धर लिखित व दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटानं थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर जणू धुमाकूळ घातलेला. चित्रपटातील डान्स, स्टेप्स, गाणी आणि सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला ‘धुरंधर २’लासुद्धा प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.

‘धुरंधर’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला. तर ‘धुरंधर २’लासुद्धा प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. जगभरातही दोन्ही चित्रपटांनी कोट्यवधी कमावले. ‘धुरंधर २’मधील रणवीर सिंहच्या कामाचं खूप कौतुक होतं आहे. पण, पहिल्या भागाच्या बाबतीतलं चित्र वेगळं होतं. ‘धुरंधर’ रिलीज झाल्यानंतर त्यातील अक्षय खन्नाच्या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालेलं. चित्रपटातील त्याचे संवाद, डान्स स्टेप्स सगळंच व्हायरल झालं होतं. अनेकांनी चित्रपटातील FA9LA या लोकप्रिय गाण्यावरील त्याचे डान्स स्टेप्स करत रील रिक्रिएट केले होते. अशातच आता भारतीय स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवसुद्धा ‘धुरंधर’मधील गाण्यावर थिरकला आहे.

सूर्यकुमार यादवचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल

‘धुरंधर’च्या पहिल्या भागातील FA9LA या लोकप्रिय गाण्यावर सूर्यकुमार थिरकला असून त्यानं अक्षय खन्नासारखे हुबेहूब डान्स स्टेप्स करत सगळ्यांचं लक्ष वेधलं. क्रिकेटपटूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्सनं सूर्यकुमार डान्स करतानाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी “ही दादाची स्टाईल आहे. धुरंधर मोड ऑन.” अशी कॅप्शन दिली आहे.

Award Banner

सूर्यकुमार यादव या व्हिडीओमधून एका कार्यक्रमात FA9LA या गाण्यावर अक्षय खन्नासारखे स्टेप्स करत स्टेजवर जाताना दिसतोय. त्याच्या या डान्समुळे त्यानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. सूर्यकुमारच्या चाहत्यांनी यावर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर २’ पाहण्यासाठी सध्या प्रेक्षक चित्रपटगृहात मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. चित्रपटानं आतापर्यंत कोट्यवधींची कमाई केली आहे. जगभरातही चित्रपटानं कोट्यवधींचं कलेक्शन केलं आहे. त्यामुळे ‘धुरंधर’प्रमाणे ‘धुरंधर २’लाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. प्रेक्षकांसह कलाकार मंडळीसुद्धा चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाचं कौतुक केलं आहे.