सूर्यकुमार यादव हे भारतीय क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍ये जगातील नंबर वन खेळाडू बनण्‍याचे सूर्यकुमारचे अजूनही स्वप्न आहे. त्याला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटपुरते मर्यादित राहायचे नाही. कसोटी क्रिकेटमध्ये आपले कौशल्य दाखवण्याची त्याला तीव्र इच्छा आहे. यावर त्याने येत्या वर्षात खूप विचार केला आहे.

सूर्या पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “हे अजूनही स्वप्नासारखे वाटते. वर्षभरापूर्वी जर कोणी मला टी२० क्रिकेटमधील प्रथम क्रमांकाचा फलंदाज म्हटले असते, तर मी कशी प्रतिक्रिया दिली असती हे मला माहीत नाही. जेव्हा मी या फॉरमॅटमध्ये खेळायला सुरुवात केली तेव्हा मला माझे सर्वोत्तम द्यायचे होते आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली.”

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
Surya's revelations about Bumrah
MI vs RCB : जसप्रीत बुमराहला नेट्समध्ये खेळायला घाबरतो सूर्यकुमार यादव, स्वत:च केला खुलासा; म्हणाला तो…

२०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळला जाईल, मग तुम्ही ५० षटकांच्या फॉरमॅटसाठी तुमचा खेळ बदलणार का? या प्रश्नावर सूर्या म्हणाला, “जेव्हा मी कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत असतो तेव्हा मी त्याचा फारसा विचार करत नाही, कारण जेव्हा मी फलंदाजीला जातो तेव्हा मला खूप मजा येते. मला असं वाटतं की जेव्हाही मी खेळपट्टीवर जाईन तेव्हा खेळ बदलून टाकणारी कामगिरी द्यायला हवी असे वाटते. मला फलंदाजी आवडते, मग ती टी२०, एकदिवसीय किंवा रणजी स्पर्धा असो.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत संधी मिळण्याबाबत तो म्हणाला, “मी राष्ट्रीय स्तरावर वयोगटात लाल चेंडूने खेळायला सुरुवात केली, त्यामुळे त्याचे उत्तर त्यात दडले आहे. पाच दिवसीय सामन्यांमध्ये, तुम्हाला अवघड, पण रोमांचक परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि तुम्हाला आव्हानाचा सामना करायचा आहे. होय, मला संधी मिळाली तर मी तयार आहे.

अधिक करण्यापेक्षा चांगल्या सरावावर लक्ष केंद्रित करा

सूर्यकुमार अधिक चांगला सराव करण्यावर लक्ष केंद्रित करतो, तो म्हणाला, “मी म्हणेन की हे कधीही अशक्य नाही, परंतु निश्चितपणे कठीण आहे. यासाठी तुमचा दृष्टीकोन चांगला असायला हवा. अधिक सराव करण्यापेक्षा चांगला सराव करण्यावर माझा भर आहे. मी आणि माझ्या कुटुंबाने खूप त्याग केला आहे. भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी मी १० वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे.”

“होय, टीम इंडियात निवड न झाल्यामुळे मी नाराज व्हायचे”

देशांतर्गत स्तरावर आणि आयपीएलमध्ये गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी करूनही तुमची राष्ट्रीय संघात निवड झाली नाही, तेव्हा तुमची निराशा झाली किंवा राग आला? या प्रश्नावर सूर्यकुमार म्हणाला, “मी चिडचिड करायचो असे मी म्हणणार नाही, पण पुढच्या स्तरावर जाण्यासाठी वेगळे काय करावे लागेल याबाबत नेहमी विचार करायचो. तरीही मी कठोर परिश्रम करत राहिलो आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या खेळाचा आनंद घ्यावा लागेल हे डोक्यात ठेवत आलो. याकरताच तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करता ना.. मला माहित होते की जर मी होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित केले नाही आणि माझ्या फलंदाजीच्या तंत्रात बदल केले तर मी एक दिवस आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकेन.

हेही वाचा: विश्लेषण: ज्यादिवशी दिग्गज संघ एकमेकांशी भिडतात असा बॉक्सिंग डे कसोटी सामना म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

सूर्याचे ३६० डिग्री तंत्र असे आले

सूर्या त्याच्या ३६० डिग्री तंत्राबद्दल म्हणाला, “ही एक मनोरंजक कथा आहे. माझ्या शालेय आणि कॉलेजच्या दिवसात मी रबर बॉलने भरपूर क्रिकेट खेळलो. कडक सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर आणि पावसाळ्याच्या दिवसात १५ यार्ड अंतरावरून तयार केलेला चेंडू वेगाने यायचा. जर लेग साइडची सीमा ९५ यार्ड असेल तर ऑफ साइड फक्त २५ ते ३० यार्ड असेल. त्यामुळे बहुतेक गोलंदाज ऑफ साइड बाऊंड्री वाचवण्यासाठी माझ्या शरीराला लक्ष्य करून गोलंदाजी करायचे. त्यामुळे मी मनगट, पुल आणि अपरकट वापरायला शिकलो. मी त्याचा नेटवर कधीच सराव केला नाही.”

विराट-रोहितसारखा बनू शकेन की नाही माहीत नाही

सूर्याने विराट कोहली आणि रोहित शर्मासोबतच्या नात्यावरही आपलं मत मांडलं. तो म्हणाला, “विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत खेळताना मी खरोखर भाग्यवान आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दिग्गज स्टार आहे. त्याने जे साध्य केले ते मी कधी साध्य करू शकेन की नाही माहीत नाही. अलीकडेच मी विराट भाईसोबत काही चांगल्या भागीदारी केल्या आणि मला त्याच्यासोबत फलंदाजी करण्यात मजा आली.”

हेही वाचा: IND vs BAN: “कुलदीप यादवला वगळल्याचा अजिबात पश्चाताप नाही…”, के एल राहुलने न खेळवण्याबाबत दिले स्पष्टीकरण

मुंबई इंडियन्स आणि देवीशाबद्दल

मुंबई इंडियन्स आणि पत्नी देविशा यांच्या कारकिर्दीतील योगदानाबद्दल सूर्या म्हणाला, “माझ्या आयुष्यातील आणि क्रिकेटच्या प्रवासात दोन स्तंभ आहेत, एक मुंबई इंडियन्स आणि दुसरे माझी पत्नी देविशा. प्रथम मी मुंबई इंडियन्सच्या योगदानाबद्दल बोलेन. जेव्हा मी कोलकाता नाईट रायडर्स सोडले आणि २०१८ मध्ये येथे आलो, तेव्हा मी क्रमवारीत वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी शोधत होतो आणि मी काहीही न बोलता संघ व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास दाखवला. २०१६ मध्ये देविशाशी लग्न केले. जेव्हा मी मुंबई इंडियनमध्ये सामील झालो तेव्हा आम्ही दोघांनी पुढच्या स्तरावर जाण्यासाठी काय करावे याचा विचार करू लागलो. जेव्हा मला तिची गरज असते तेव्हा ती माझ्या पाठीशी उभी राहायची. देविशाने मला एक खेळाडू म्हणून हवे तसे स्वातंत्र दिले.