Suryakumar Yadav Reacts On Abhishek Sharma Post: भारताचा स्टार युवा फलंदाज अभिषेक शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. पण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये मिळून त्याला अवघ्या ११ धावा करता आल्या. त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर जोरदार टीका केली जात आहे. अभिषेक शर्मा स्वत: आपल्या कामगिरीवर नाराज आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा तिसरा टी-२० सामना झाल्यानंतर त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यातही अभिषेक शर्मा फ्लॉप ठरला. या सामन्यात तो अवघ्या २ धावा करुन माघारी परतला. या सुमार कामगिरीनंतर त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. यासह दमदार कामगिरी करेन, असंही म्हटलं आहे. अभिषेकने आपला फोटो पोस्ट केला आणि त्यावर कॅप्शन देत लिहिले, “जेव्हा लोकांना तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा असतात आणि तु्म्ही त्या पूर्ण करु शकत नाही, तेव्हा खूप जास्त वाईट वाटतं. हा खेळ नेहमीच अशा खेळाडूंना फळ देतो, जे खूप मेहनत करतात. संघाने मालिका जिंकली, याचा मला आनंद आहे. मी आणखी दमदार पुनरागमन करेन.”

अभिषेक शर्माच्या या पोस्टवर क्रिकेट चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींच्या मते, फ्लॉप कामगिरीमुळे अभिषेक शर्माला विश्रांती दिली गेली पाहीजे आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळायला हवी. तर काहींनी अभिषेक शर्माचं समर्थन केलं आहे. अभिषेक स्वत:ला सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यादरम्यान भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार सूर्युकमार यादवने देखील अभिषेक शर्माचं समर्थन केलं आहे. अभिषेक शर्माच्या पोस्टवर कमेंट करत सूर्यकुमार यादवने लिहिले की, ” तू गेल्या २ वर्षांत आम्हाला अनेकदा जल्लोष करण्याची संधी दिली आहे. तू जेव्हा भारतीय संघाला गरज होती,तेव्हा चांगली कमगिरी केली आहे. ही वेळही निघून जाईल. तू जसा आहेस, तसाच रहा.”

भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ३५ धावांनी दमदार विजयाची नोंद केली. यासह ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केली. इतर फलंदाजांनी फलंदाजीत योगदान दिलं, पण अभिषेक शर्मा फलंदाजीत नावाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. ३ सामन्यांमध्ये त्याने केवळ ११ धावा केल्या. पहिल्या सामन्यात तो १ धावेवर, दुसऱ्या सामन्यात ८ आणि तिसऱ्या सामन्यात अवघ्या २ धावा करुन माघारी परतला.