scorecardresearch

“म्हणजे केएल राहुलने खेळू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे का?”; सूर्यकुमार यादवचे पत्रकारांना मजेशीर उत्तर

दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलच्या फॉर्मबद्दल चर्चा रंगू लागल्या असताना भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने मात्र केएल राहुलचे समर्थन केले आहे.

“म्हणजे केएल राहुलने खेळू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे का?”; सूर्यकुमार यादवचे पत्रकारांना मजेशीर उत्तर
फोटो सौजन्य – ट्वीटर

Asia Cup 2022 : दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलच्या फॉर्मबद्दल चर्चा रंगू लागल्या असताना भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने मात्र के एल राहुलचे समर्थन केले आहे. केएल राहुल नुकताच दुखापतीतून सावरला असून त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे तो म्हणाला.

हेही वाचा – Asia Cup 2022: मॅच हरल्यावर हॉंगकॉंग क्रिकेट संघाने केलेली ‘ही’ कृती पाहून कोहली झाला खुश, म्हणाला “तुम्ही..

बुधवारी झालेल्या हॉंगकॉंगविरुद्धच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने २६ चेंडूत ६८ धावांची पारी खेळत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांचा येणाऱ्या काळात केएल राहुलच्या जागी तू सलामीला येणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर सुर्यक्रमारने ”म्हणजे केएल राहुलने खेळू नये असं तुम्हाला वाटतं का? असा प्रतिप्रश्न केला. यावरून जोरात हशा पिकला. तो पुढे म्हणाला. ”राहुल दुखापतीतून नुकताच सावरला आहे. त्यालाही थोडा वेळ द्यायला हवा. माझ्यासंदर्भात बोलायचं झाल्यास, मी नेहमीच म्हणतो, की मला कोणत्याही नंबरवर फलंदाजी करायला तयार आहे. यासंदर्भात मी प्रशिक्षक आणि कर्णधाराला सांगितले आहे.”

हेही वाचा – Asia Cup 2022: रोहित शर्मा ठरला विराट कोहलीवर भारी; हाँगकाँग विरुद्ध विजयानंतर रचला ‘हा’ विक्रम

यावेळी फलंदाजीच्या क्रमवारीतील सततच्या बदलांबाबतही त्याने स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, या प्रयोग सुरूच राहतील. अशा अनेक प्रयोग आम्ही करत आहोत. असे प्रयोग सरावादरम्यान करण्यापेक्षा सामन्यादरम्यान करणे फायदेशीर ठरेल.”

सूर्यकुमारने भारताचा युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला अर्शदीप यांचेही समर्थन केले. हे दोघेही हाँगकाँगविरुद्ध चांगलेच महागात पडले होते. आवेशने चार षटकांत ५३ धावा दिल्या, तर अर्शदीपने ४ षटकांत ४४ धावा दिल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suryakumar yadav spoke about kl rahul form in asia cup spb