सुशीलच्या पोलीस कोठडीत वाढ

मागील रविवारी झालेल्या अटकेनंतर न्यायालयाने सुशीलला चौकशीसाठी सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले होते

sushil kumar
सुशील कुमार

छत्रसाल स्टेडियमवर २३ वर्षीय कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदकविजेत्या सुशील कुमारच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय शनिवारी दिल्ली न्यायालयाने घेतला आहे.

मागील रविवारी झालेल्या अटकेनंतर न्यायालयाने सुशीलला चौकशीसाठी सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले होते. शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयात सादर करण्यात आले.

‘‘न्यायाच्या हितासाठी सुशीलच्या कोठडीत वाढ करण्यासाठी पोलिसांनी केलेला अर्ज संमत करण्यात आला आहे,’’ असे महानगर दंडाधिकारी मयांक गोएल यांनी सांगितले. या प्रकरणी शनिवारी दिल्लीतून रोहित करूर आणि विजेंदर या आणखी दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sushil kumar the olympic medalist in the murder case has been remanded in police custody for four days akp

ताज्या बातम्या