अहमदाबाद : विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने डायव्हिंग प्रकारात सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचबरोबर अर्जुन कढे-ऋतुजा भोसले जोडीने टेनिसच्या मिश्र दुहेरीत सोनेरी यश मिळविले. डायव्हिंगमध्ये ऋतिका श्रीरामने स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक मिळविले. हायबोर्ड प्रकारात ऋतिकाने ही सोनेरी कामगिरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी तीन मीटर स्प्रिंगबोर्ड प्रकारातही ऋतिका सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती.  टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत अर्जुन कढे-ऋतुजा भोसले या महाराष्ट्राच्या जोडीला सुवर्णपदक मिळाले. प्रतिस्पर्धी शर्मदा बालू-प्रज्ज्वल देव जोडीने पहिल्या सेटमध्ये १-१ अशा बरोबरी असताना माघार घेतली. शर्मदा पायाच्या दुखापतीमुळे खेळू शकत नव्हती. पुरुष एकेरीच्या लढतीत अर्जुन कढेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत मनिष कुमारने पहिला सेट गमाविल्यावरही अर्जुनचा १-६, ६-१, ६-३ असा पराभव केला

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swimmer ritika sriram won gold at national games 2022 zws
First published on: 06-10-2022 at 02:38 IST