scorecardresearch

स्विस खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, कश्यप उपांत्यपूर्व फेरीत

जागतिक अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या भारताच्या सातव्या मानांकित किदम्बी श्रीकांतने गुरुवारी फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्हविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवत स्विस खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

पीटीआय, बॅसेल : जागतिक अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या भारताच्या सातव्या मानांकित किदम्बी श्रीकांतने गुरुवारी फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्हविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवत स्विस खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत १२व्या क्रमांकावरील श्रीकांतने क्रमवारीत ६०व्या क्रमांकावरील पोपोव्हला एक तास आणि १३ मिनिटे चाललेल्या सामन्यात १३-२१, २५-२३, २१-११ असे पराभूत केले. पुढील फेरीत श्रीकांतची द्वितीय मानांकित डेन अँडर्स अँटनसेनशी होणार आहे.

माजी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपला उपांत्यपूर्व फेरीत पुढे चाल मिळाली आह़े त्याचा प्रतिस्पर्धी ऑलिम्पिक विजेत्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनने सामन्यातून माघार घेतली. तिसऱ्या मानांकित सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचे पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत आव्हान संपुष्टात आले. इंडोनेशियाच्या प्रमुद्या कुसुमावर्दना आणि येरेमिआ ईरिच योचे याकोब रॅम्बिटॅन जोडीकडून १९-२१, २०-२२ अशा फरकाने सात्त्विक-चिराग जोडीने पराभव पत्करला.

महिला एकेरीत दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या हॉजमार्क काईर्सफेल्डवर सरळ गेममध्ये विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. माजी विश्वविजेत्या सिंधूने पहिल्या सामन्यात बुधवारी हॉजमार्कवर २१-१४, २१-१२ असा विजय मिळवला.  अश्मिता छलिहाने आठव्या मानांकित क्रिस्टी गिल्मॉरकडून १८-२१, २०-२२ अशी हार पत्करली.

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने स्वित्र्झलडच्या अ‍ॅलिने म्यूलर आणि जेंजिरा स्टेडेलमॅनचा २१-१५, २१-१६ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीने इंडोनेशियाच्या फाजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्डियांटो जोडीकडून १९-२१, १३-२१ अशी हार पत्करली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swiss open badminton tournament srikanth kashyap in the quarterfinals win loss ysh

ताज्या बातम्या