लखनऊ : अग्रमानांकित पीव्ही सिंधू व लक्ष्य सेन यांनी रविवारी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ३०० दर्जा) अनुक्रमे महिला व पुरुष एकेरी गटाचे जेतेपद मिळवले.

दोन ऑलिम्पिक पदकविजेती सिंधूने चीनच्या वू लुओ यू वर २१-१४, २१-१६ असा सरळ गेममध्ये विजय मिळवत तिसऱ्यांदा स्पर्धेचा किताब मिळवला. सिंधूने यापूर्वी २०१७ व २०२२ मध्ये स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. सिंधूने पहिल्या गेमला चांगली सुरुवात करताना ८-५ अशी आघाडी घेतली. मात्र, मध्यंतरापर्यंत सिंधू ११-९ अशी आघाडीवर होती. यानंतर सिंधूने वू ला कोणतीच संधी न देता पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेमला सिंधूने आक्रमक सुरुवात केली. मात्र, वू ने पुनरागमन करत १०-१० अशी बरोबरी साधली. गेमच्या मध्यंतरानंतर सिंधूने वू च्या चुकांचा फायदा घेत १५-११ अशी आघाडी मिळवली. यानंतर वू ला कोणतीही संधी न देता गेमसह सामना जिंकला. सिंधूने २०२२ मध्ये सिंगापूर स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. या वर्षी मलेशिया मास्टर्स स्पर्धेची अंतिम फेरी तिने गाठली होती.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> भारताची कोरियावर मात

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्ष्यने सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहला २१-६, २१-७ असा विजय नोंदवला. लक्ष्य पहिल्या गेममध्ये ८-० असा आघाडीवर होता. त्याच्या आक्रमक खेळाने तेहच्या अडचणीत वाढ झाली. लक्ष्यने तेहने कोणतीही संधी न देता पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने आपली हीच लय कायम राखली व सुरुवातीलाच १०-१ अशी भक्कम आघाडी मिळवली. लक्ष्य १५-५ असा आघाडीवर असताना तेहनबे काही फटके मारत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश मिळाले नाही. लक्ष्यने सहज गुणांची कमाई करत सामन्यात विजय नोंदवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

दुहेरीत ट्रीसा- गायत्रीची चमक

ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद या महिला दुहेरी जोडीने बाओ ली जिंग व ली कियान या चीनच्या जोडीला २१-१८, २१-११ असे नमवत जेतेपद पटकावले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या या जोडीसाठी हा विजय ऐतिहासिक आहे. कारण, या स्पर्धेचे जेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय महिला दुहेरी जोडी बनली आहे. भारताच्या पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय व साई प्रतीक या पुरुष दुहेरी जोडीला चीनच्या हुआंग डी व लियू यांग जोडीकडून १४-२१, २१-१९, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. तर, पाचव्या मानांकित तनीषा क्रॅस्टो व ध्रुव कपिला या मिश्र दुहेरी जोडीनेही थायलंडच्या डेचापोल पुआवारानुक्रोह व सुपिसारा पाएवसम्प्रान जोडीकडून २१-१८, १४-२१, ८-२१ अशी हार पत्करली.

Story img Loader