सय्यद मुश्ताक अली चषकात साखळी फेरीच्या सामन्यात मुंबईच्या अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉची बॅट चांगलीच तळपली. मुंबईने बडोद्यावर ८२ धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने २ गडी गमवून १९३ धाव केल्या. यात पृथ्वी शॉने ८३, तर अजिंक्य रहाणेने ७१ धावांची खेळी केली. बडोद्याचा संघ ९ गडी गमवून १११ धावा करू शकला. पृथ्वी शॉने ६३ चेंडूत ८३ धावा केल्या. या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. तर अजिंक्य रहाणने ४५ चेंडूत ७१ धावा केल्या. या खेळीत २ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश आहे.

मुंबईचा डाव
बरोड्याने नाणेफेक जिंकत प्रथम मुंबईला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. हा निर्णय सलामीला आलेल्या पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे जोडीने चुकीचा ठरवला. दोघांनी पहिल्या गड्यासाठी १५१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रथवाच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे यष्टीचीत झाला. अजिंक्य रहाणनेने ४५ चेंडूत ७१ धावा केल्या. त्यानंतर पृथ्वी शॉ ६३ चेंडूत ८३ धावा करून बाद झाला. अतित शेठच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला.

भारताच्या T20 संघाची धुरा रोहित शर्माकडे?; न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व…

बरोड्याचा डाव
मुंबईने विजयासाठी दिलेल्या १९१ धावांचा पाठलाग करताना बरोड्याचा संघाचा एकही खेळाडू चांगली कामगिरी करु शकला नाही. केदार देवधर (५), विष्णू सोलंकी (२७), ध्रुव पटेल (८), भानु पानिया (०), कृणाल पंड्या (११), पार्थ कोहली (१३), अतित शेठ (३), निनाद रथवा (१७), कार्तिक काकडे (०) अशा धावा करून बाद झाले. लुकमन मेरिवाला (९) आणि चिंता गांधी (९) नाबाद राहिले. मुंबईकडून तनुष कोटियनने ४ षटकात १६ धावा देत ४ गडी बाद केले.

मुंबईचा संघ- पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अमान हकिम खान, सिद्देश लाड, हार्दिक तमोरे, यशस्वी जैयस्वाल, मोहित अवस्थी, अथर्व अंकोलेकर, प्रशांत सोलंकी, तनुष कोटियन

बरोड्याचा संघ- केदार देवधर, विष्णू सोलंकी, ध्रुव पटेल, भानु पनिया, कृणाल पंड्या, पार्थ कोहली, अतित शेठ, निनाद राथवा, कार्तिक काकडे, लुकमन मेरिवाला, चिंता गांधी