T20 World Cup 2026 Super-8: टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर-८ चे संघ निश्चित झाले आहेत. २० संघांना ४ गटांमध्ये विभागण्यात आलं होतं. या प्रत्येक गटातून २ अव्वल संघ पुढच्या फेरीत पोहोचले आहेत. गट टप्प्यातील सामने २० फेब्रुवारीपर्यंत खेळवले जाणार आहेत. त्यानंतर २१ फेब्रुवारी रविवारपासून श्रीलंका आणि भारतात सुपर-८चे सामने खेळवले जातील. सुपर-८सामन्यांचं वेळापत्रक कसं असणार जाणून घेऊया.

२१ फेब्रुवारी ते १ मार्च यादरम्यान १२ सुपर-८चे सामने खेळवले जातील. यानंतर ४ मार्च व ५ मार्चला सेमीफायनल सामने होती. यानंतर ८ मार्चला टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तत्त्पूर्वी सुपर-८ साठी पात्र ठरलेले कोणते संघ आहेत, जाणून घेऊया.

टी-२० वर्ल्डकप २०२६ सुपर-८ फेरीसाठी कोणकोणते संघ क्वालिफाय झाले?

सुपर-८ साठीच्या संघांना दोन गटांत समान विभागलं आहे. यातील टॉप-२ संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. पहिल्या गटात भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ आहेत. तर दुसऱ्या गटात इंग्लंड, न्यूझीलंड श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ आहेत. पाकिस्तान संघ नामिबियाला पराभूत केल्यानंतर सुपर-८ साठी पात्र ठरणारा अखेरचा संघ ठरला. तर सर्वात धक्कादायक म्हणजे आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाेत्कृष्ट कामगिरी करणारा चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलिया प्राथमिक फेरीतून बाहेर पडला आहे.

टी-२० विश्वचषक २०२६ सुपर-८चं संपूर्ण वेळापत्रक

२१ फेब्रुवारी – न्यूझीलंड वि. पाकिस्तान, कोलंबो- संध्याकाळी ७ वाजता

२२ फेब्रुवारी – श्रीलंका वि. इंग्लंड, कँडी – दुपारी ३ वाजता

२२ फेब्रुवारी – भारत वि. दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद – संध्याकाळी ७ वाजता

२३ फेब्रुवारी – वेस्ट इंडिज वि. झिम्बाब्वे, मुंबई – संध्याकाळी ७ वाजता

२४ फेब्रुवारी – इंग्लंड वि. पाकिस्तान, कँडी – संध्याकाळी ७ वाजता

२५ फेब्रुवारी – श्रीलंका वि. न्यूझीलंड, कोलंबो – संध्याकाळी ७ वाजता

२६ फेब्रुवारी – दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज, अहमदाबाद – दुपारी ३ वाजता

२६ फेब्रुवारी – भारत वि. झिम्बाब्वे, चेन्नई – संध्याकाळी ७ वाजता

२७ फेब्रुवारी – इंग्लंड वि. न्यूझीलंड, कोलंबो – संध्याकाळी ७ वाजता

२८ फेब्रुवारी – श्रीलंका वि. पाकिस्तान, कोलंबो – संध्याकाळी ७ वाजता

१ मार्च – दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे, अहमदाबाद – दुपारी ३ वाजता

१ मार्च – भारत वि. वेस्ट इंडिज, कोलकाता – संध्याकाळी ७ वाजता

टी-२० विश्वचषक २०२६ मधील सामने स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येतील. तर मोबाईलवर जिओ हॉटस्टार अॅपवर या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.