टी २० विश्वचषकात आकर्षक जर्सी म्हणून स्कॉटलँडच्या जर्सीकडे पाहिलं जात असताना ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेत दोन वेगवेगळ्या जर्सीत दिसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पर्यायी जर्सीचं नुकतंच अनावरण केलं आहे. संघाची मुख्य जर्सी ही काळा, सोनेरी आणि हिरव्या रंगात आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने २०२० मध्ये टी २० विश्वचषकादरम्यान ही जर्सी परिधान केली होती. ऑस्ट्रेलियाची ही जर्सी काही सहयोगी देशांसारखीच असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयसीसीच्या मते, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि नामिबिया संघाच्या जर्सीही सारख्याच आहे. त्यामुळे जर या संघाविरुद्ध सामना असल्यास दुसरी जर्सी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहयोगी देशांकडे नवीन जर्सी डिझाइन करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पिवळी जर्सी घालण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, टी २० वर्ल्डकपपूर्वीच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं १५३ धावांचं आव्हान भारताने दोन गडी गमवून १८ व्या षटकात पूर्ण केलं. आतापर्यंत झालेल्या दोन सराव सामन्यात भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्मात दिसले. त्यामुळे टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचं पारडं जड असल्याचं दिसत आहे.

ऑस्ट्रेलिया
आरोन फिंच (कप्तान), एस्टन एगर, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर आणि एडम झम्पा.

राखीव : डॅन ख्रिश्चन, नाथन एलिस, डेवियन सॅम्स.