T20 WC: बांगलादेशकडून ओमानचा २६ धावांनी पराभव; सुपर १२ मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी आता…!

टी २० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत बांगलादेशनं ओमान २६ धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

Bangladesh_Team
T20 WC: बांगलादेशकडून ओमानचा २६ धावांनी पराभव; सुपर १२ मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी आता…! (Photo- ICC Twitter)

टी २० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत बांगलादेशनं ओमानला २६ धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. बांगलादेशने २० षटकात सर्वबाद १५३ धावा केल्या होत्या आणि ओमानला विजयासाठी १५४ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ओमानचा संघ २० षटकात ९ गडी गमवून १२७ धावा करू शकला. स्कॉटलँडकडून पराभव स्वीकारल्यानंतर बांगलादेशला हा सामना जिंकणं गरजेचं होतं. आता ओमानला पराभूत केल्याने बांगलादेशची सुपर १२ मध्ये जाण्याची दारं अजूनही खुली आहेत.

ग्रुप बी मध्ये स्कॉटलँड, ओमान, बांगलादेश आणि पापुआ न्यू गिनी संघ आहेत. स्कॉटलँडने सलग दोन सामने जिंकल्याने सुपर १२ मधील स्थान जवळपास निश्चित केलं आहे. स्कॉटलँडची धावगती +०.५७५ इतकी असून गुणतालिकेत संघ अव्वल स्थानी आहे. तर ओमानला बांगलादेशकडून पराभव सहन करावा लागला असला तरी धावगती चांगली असल्याने दुसऱ्या स्थानी आहे. ओमानचा पहिला सामना पापुआ न्यू गिनी सोबत झाला. यात पापुआ न्यू गिनीने दिलेलं आव्हान ओमानने १४ षटकात पूर्ण केलं. त्यामुळे धावगती चांगली आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर बांगलादेशचा संघ आहे. स्कॉटलँडकडून मिळालेल्या पराभवानंतर आता धावगती राखण्याचं बांगलादेशसमोर आव्हान आहे. बांगलादेशचं अस्तित्व आता जर तर वर अवलंबून आहे. दुसरीकडे पापुआ न्यू गिनीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

ओमान विरुद्धच्या सामन्यात मोहम्मन नईमने सर्वोत्तम खेळी केली. ५० चेंडूत ६४ धावा केल्या. तर शाकिब अल हसनने २९ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. तसेच ४ षटकात २८ धावा देत ३ गडी बाद केले. शाकिबला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc bangladesh beat oman by 26 runs rmt

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी