टी २० वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रता फेरीत बांगलादेशनं पापुआ न्यू गिनी संघाला ८४ धावांनी पराभूत केलं. बांगलादेशनं प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने ७ गडी गमवून १८१ धावा केल्या आणि पापुआ न्यू गिनीसमोर विजयासाठी १८२ धावांचं आव्हान ठेवलं. पापुआ न्यू गिनी संघ मात्र सर्वबाद ९७ इतक्याच धावा करू शकला. आता सुपर १२ साठी स्कॉटलँड आणि ओमान सामन्याकडे नजर असणार आहे. स्कॉटलँडने ओमानचा पराभव केल्यास सुपर १२ मधलं स्थान निश्चित होणार आहे. मात्र ओमानकडून स्कॉटलँडचा पराभव झाल्यास धावगतीवर अवलंबून असणार आहे

पापुआ न्यू गिनीचा डाव

पापुआ न्यू गिनीचा संघ बांगलादेशनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पूर्णत: कोलमडून गेला. एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होण्याची रांग लागली. सुरुवातीला आलेले ७ फलंदाज एकेरी धावांवर बाद झाले. लेगा सिआका (५), असाद वाला(६), चार्ल्स अमिनी(१), सेसे बाऊ(७), सिमॉन अटाइ(०), हिरी हिरी(८), नॉरमन वानुआ (०) अशा धावा करत गडी बाद झाले. त्यानेंतर किप्लीन डोरिगा याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ लाभली नाही. चॅड सोपर (११), कबुआ मोरिआ (३) धावा करून बाद झाले.

बांगलादेशचा डाव

बांगलादेशच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. मोहम्मद नइम खातं न खोलता बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी लिटॉन दास आणि शाकिब अल हसन जोडीने ५० धावांची भागीदारी केली. त्यानंतर लिटॉन दास बाद होत तंबूत परतला. त्याने २३ चेंडूत २९ धावा केल्या. त्यानंतर मुशफिकर रहिम तंबूत परतला. त्याने अवघ्या ५ धावा केल्या. त्यानंतर शाकिब आमि महमुदुल्ला या जोडीनं डाव सावरला. महमुदुल्लाने २८ चेंडू ५० धावा केल्या. या ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. शाकिब ४६ धावा करून असाद वालाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर अफिफ होसैननं २१ धावा करून तंबूत परतला.

बांगलादेशचा संघ
मोहम्मद नइम, लिटॉन दास, शाकिब अल हसन, मुशफिकर रहिम, महमुदुल्ला, अफिफ होसैन, नुरुल हसन, मोहम्मद सैफुद्दीन, महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्ताफिजूर रहमान

पापुआ न्यू गिनीचा संघ
लेगा सिआका, असाद वाला, चार्ल्स अमिनी, सेसे बाऊ, सिमॉन अटाइ, हिरी हिरी, नॉरमन वानुआ, किप्लीन डोरिगा, चॅड सोपर, कबुआ मोरिआ, डॅमिन रावू