T20 WC: दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडला १० धावांनी हरवलं; पण उपांत्य फेरीत…

इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी ८ गुण आहेत.

SA_WOn
T20 WC: दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडला ११ धावांनी हरवलं; पण…(T20wc / twitter)

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला १० धावांनी पराभूत केलं. मात्र उपांत्य फेरीत पोहोचण्यात अपयश आलं आहे. इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी ८ गुण आहेत. मात्र धावगती कमी पडल्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत वर्णी लागली आहे. इंग्लंडचे ८ गुण आणि +२.४६४ धावगती, ऑस्ट्रेलियाची ८ गुण आणि +१.२१६ धावगतीसह उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेची ८ गुणांसह धावगती +०.७३९ इतकी असल्याने आव्हान संपुष्टात आलं आहे.

इंग्लंडचा डाव
इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. जेसन रॉयला पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जबर दुखापत झाल्याने रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर जोस बटलर १५ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. लगेचच जॉनी बेअरस्टो अवघी १ धाव करून तंबूत परतला. मोइन अलीने २७ चेंडूत ३७ धावांची खेळी करून बाद झाला. तबरेज शम्सीच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. मोइन अलीने आपल्या खेळात ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. डेविड मालानच्या रुपाने इंग्लंडला चौथा धक्का बसला. त्याने २६ चेंडूत ३३ धावा केल्या. या खेळीत ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. लिविंगस्टोन १७ चेंडूत २८ धावा करून तंबूत परतला. इंग्लंडला विजयासाठी १४ धावांची आवश्यकता असताना शेवटचं षटक कगिसो रबाडाच्या हाती सोपवलं. या षटकात ३ चेंडूत गडी बाद कगिसो रबाडाने हॅटट्रीक घेतली. पहिल्या चेंडूवर ख्रिस वोक्स बाद झाला, दुसऱ्या चेंडूवर इऑन मॉर्गन बाद झाला आणि तिसऱ्या चेंडूवर ख्रिस जॉर्डन बाद झाला. या स्पर्धेतील ही तिसरी हॅटट्रीक आहे.

दक्षिण आफ्रिकेचा डाव
दक्षिण आफ्रिकेला रीझा हेन्ड्रिकच्या रुपाने पहिला धक्का बसला. अवघ्या २ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि रस्सी वॅनदर दुस्सेन या जोडीनं डाव सावरला. दुसऱ्या गड्याासठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर क्विंटन डिकॉक २७ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. रस्सी वॅनदर दुस्सेन आणि एडन मारक्रम जोडीने शतकी भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. रस्सीने ६० चेंडूत ९४ धावा केल्या. या खेळीत ५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. तर एडन मारक्रमने २५ चेंडूत ५२ धावा केल्या. या खेळीत २ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ- क्विंटन डिकॉक, रीझा हेन्ड्रिक, रस्सी वॅनदर दुस्सेन, एडन मारक्रम, टेम्बा बवुमा, डेविड मिलार, ड्वेन प्रेटोरिअस, कागिसो रबाडा, केशव महाराज, अनरिज नॉर्तजे, तबरेज शम्सी

इंग्लंडचा संघ- जेसन रॉय, जॉस बटलर, डेविड मालान, जॉनी बेअरस्टो, इऑन मॉर्गन, मोइन अली, लिआम लिविंगस्टोन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, अदिल राशीद, मार्क वूड

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc eng vs sa match update rmt