T20 WC : भारत-पाक सामन्याआधीच हरभजन सिंग आणि शोएब अख्तर ट्विटरवर भिडले!

टी -२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी वातावरण तापू लागले आहे.

shoaib
हरभजन सिंगने शोएबच्या ट्विटला उत्तर देत फिरकी घेतली आहे. 

टी -२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी वातावरण तापू लागले आहे. दोन्ही संघांचे दोन दिग्गज खेळाडू सोशल मीडियावर समोरासमोर आहेत. दरम्यान रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर आणि हरभजन सिंग हे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर भिडले आहेत. या दोघांमध्ये एक वाद सुरू आहे. 

शोएब अख्तरने एका कार्यक्रमाचा फोटो शेअर केला. सोबत लिहले की, मी हरभजन सिंग यांच्यासोबत आहे, ज्यांना मी पूर्णपणे ओळखतो. हरभजन सिंगने शोएबच्या ट्विटला उत्तर देत फिरकी घेतली आहे. 

हरभजनने लिहले, “जेव्हा तुमच्याकडे ४०० पेक्षा जास्त टेस्ट विकेट असतात तेव्हा मला खात्री असते की तुम्हाला क्रिकेटबद्दल अधिक माहिती असेल तर २०० पेक्षा कमी विकेट असलेले कोणीतरी तुम्हाला ओळखेल.”

यानंतर शोएब अख्तरने फोटो शेअर केला, ज्यात भारतीय फलंदाज त्याच्या धारदार गोलंदाजीसमोर बाउन्सर टाळताना दिसत आहेत. शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरचा एक फोटोही शेअर केला आहे. शोएब अख्तर आणि हरभजन सिंग हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. दोन्ही खेळाडू टीव्ही शो, रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेकवेळा सोबत दिसले आहेत.

टी-२० विश्वचषकातील टीम इंडियाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघ बराच काळानंतर एक सामना खेळत आहेत. जर आपण टी -२० विश्वचषकाबद्दल बोललो तर दोन्ही संघांनी आत्तापर्यंत ५ सामने खेळले आहेत, ज्यात टीम इंडियाने पाचही जिंकले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc harbhajan singh and shoaib akhtar clash on twitter before india pakistan match srk

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या