T20 WC: पाकिस्तानला समजली ऑस्ट्रेलिया संघाची ‘अंदर की बात’; प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी…

माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रशिक्षक मॅथ्यू हेडनच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करत आहे. आता उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

Pakistan_Team_Hayden
T20 WC: पाकिस्तानला समजली ऑस्ट्रेलिया संघाची 'अंदर की बात'; प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी…

टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. पाकिस्तान संघाने सुपर १२ फेरीतील सलग ५ सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे यंदाच्या वर्ल्डकपसाठी पाकिस्तानला प्रमुख दावेदार मानलं जात आहे. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रशिक्षक मॅथ्यू हेडनच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करत आहे. आता उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासोबतचा उपांत्य फेरीचा सामना जिंकत अंतिम फेरी गाठायची संधी आहे. यासाठी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन पाकिस्तानी संघाला गुरूमंत्र देत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा संघ दोन दशक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत राहिला आहे. त्यामुळे खेळाडूंचीच नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संस्कृतीबद्दलची माहिती असल्याचं पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांचा गुरूमंत्र पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत पोहोचवण्यास मदत करणार आहे. ५० वर्षीय मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियासाठी १५ वर्षे क्रिकेट खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची विचारशैली त्यांना माहिती आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू चांगले खेळत आहे. फिंच, वॉर्नर आणि मार्श यांनी ऑस्ट्रेलिया संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. मात्र त्यांची फलंदाजी मॅथ्यू हेडन यांनी जवळून पाहिली आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या कमकुवत बाजू त्यांना माहिती आहे. त्यामुळे याचा थेट फायदा पाकिस्तानी खेळाडूंना होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे खेळाडूंचा अंदाज एकमदम स्पष्ट आहे. विरोधी संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांवर दबाव टाकून खेळतात, तसेच डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. जर फलंदाज चांगला फॉर्मात असेल तर तर त्याला रुळावर आणण्यासाठी खेळाडू स्लेजिंगचा वापर करतात. यावेळी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान फॉर्मात आहेत. अशात ऑस्ट्रेलियान खेळाडू स्लेजिंगचं हत्यार वापरू शकतात. हेडन यांनीही आपल्या कारकिर्दीत याचा वापर केला आहे. अशा ऑस्ट्रेलिया संघाची रणनिती हाणून पाडण्यास मदत होणार आहे. हेडन २००३, २००७ विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc pakistan coach matthew hayden known the secret of australia team rmt

ताज्या बातम्या