टी २० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना गमवल्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामना दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचा होता. मात्र या सामन्यात क्विंटन डिकॉक प्लेईंग इलेव्हनमध्ये नव्हता. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यानंतर ब्लॅक लाईव्ह मॅटर्स अभियानात सहभाग नोंदवणार नसल्याने त्याला वगळण्यात आलं होतं. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा त्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे सामन्यात राष्ट्रगीत झाल्यानंतर क्विंटन डिकॉक ब्लॅक लाईव्ह मॅटर अभियानाला पाठिंबा देताना दिसला. गुडघ्यावर बसून त्याने ब्लॅक लाईव्ह मॅटर अभियानाला पाठिंबा दर्शवला.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डासोबत क्विंटनचा वाद झाला होता. त्यानंतर संघाकडून कधीच खेळणार नाही, या बातम्याही समोर आल्या होत्या. हा वाद पेटल्यानंतर डिकॉकने दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. त्यानंतर त्याचं संघात पुनरागमन झालं आहे. क्लास्सेनच्या जागेवर त्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये वर्णी लागली आहे.

क्विंटन डिकॉक गुडघ्यावर बसल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. नेटकऱ्यांनी मजेशीर ट्वीट शेअर करत खडेबोल सुनावले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा संघ- टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रीझा हेन्ड्रिक्स, एडन मारक्रम, रस्सी वॅनदर डुस्सेन, डेविड मिलार, ड्वेन प्रेटोरिअस, कासिगो रबाडा, केशव महाराज, अनरिच नार्तजे, तबरेज शम्सी

श्रीलंकेचा संघ- पथुम निस्सांका, कुसल परेरा, चरिथ असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, दासुन शनाका, चमिका करुणारत्ने, वनिंदू हसरंगा, दुशमंथा चमीरा, महीश थीकशना, लहिरु कुमारा