T20 WC: “ग्रीव्ह्स संपूर्ण भारत तुझ्या पाठिशी आहे”; स्कॉटलंडच्या यष्टीरक्षकाचा न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातला व्हिडिओ व्हायरल

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातील यष्टीरक्षक मॅथ्यू क्रॉसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Scotland_Cricket_Team
(Photo- Scotland Cricket Twitter)

टी २० वर्ल्डकपमध्ये भारत स्कॉटलँड, नामिबिया आणि अफगाणिस्तान संघांकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. उपांत्य फेरीत जाण्यासाठी या संघांच्या खेळीवर गणितं अवलंबून आहेत. स्कॉटलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलंडने सुरुवातीचं षटकं सावधगिरीने टाकली तसेच तीन गडी झटपट बाद केले. मात्र गुप्टील आणि फिलिप्स जोडीने डाव सावरत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातील यष्टीरक्षक मॅथ्यू क्रॉसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

स्कॉटलंडने संघाचं आठवं षटक ख्रिस ग्रीव्ह्सच्या हाती सोपवलं होतं. या षटकातील ३ चेंडू टाकून झाल्यानंतर मॅथ्यू क्रॉसनं ग्रीव्ह्सचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक वक्तव्य केलं. “कमॉन ख्रिस ग्रीव्ह्स, संपूर्ण भारत तुझ्या पाठिशी आहे”, असं वक्तव्य त्याने केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे मॅथ्यू क्रॉसने फलंदाजी करताना एडम मिलनेला एका षटकात ५ चौकार ठोकले. मॅथ्यूने २९ चेंडूत २७ धावांची खेली केली. मात्र टीम साउथीच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला.

न्यूझीलंडचा डाव
न्यूझीलंडला संघाची धावसंख्या ३५ असताना पहिला धक्का बसला. डॅरिल मिशेल १३ धावा करून तंबूत परतला. शफयान शरिफच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या केन विलियमसनला आपलं खातंही खोलता आलं नाही. शफयानच्या गोलंदाजीवर मॅथ्यू क्रॉसने त्याचा झेल घेतला. डेवॉन कॉनवेही अवघी १ धाव करून माघारी परतला. मार्क वॅटने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. चौथ्या गड्यासाठी मार्टिन गुप्टिल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यात शतकी भागीदारी झाली. ब्रॅड व्हिलच्या गोलंदाजीवर फिलिप्सने उंच फटका मारल्यानंतर ख्रिस ग्रीव्ह्सने त्याचा झेल घेतला. फिलिप्सने ३७ चेंडूत ३३ धावा केल्या. पुढच्या चेंडूवर मार्टिन गुप्टील ९३ धावा करून बाद झाला. त्याचं शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं. ५६ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ९३ धावा केल्या. ब्रॅड व्हिलच्या गोलंदाजीवर कॅलम मॅकल्योडने त्याचा झेल घेतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc scotland wicketkeeper video viral rmt

ताज्या बातम्या