टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने धडक मारली आहे. ग्रुप १ मध्ये इंग्लंडने ५ पैकी ४ सामने जिंकत ८ गुण आणि +२.४६४ धावगतीसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ५ पैकी ४ सामने जिंकत ८ गुण आणि +१.२१६ धावगतीसह दुसऱ्या स्थानावर आहे. ग्रुप २ मध्ये पाकिस्तान सलग पाच विजयांसह अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडने ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवत ८ गुणांसह धावगती +१.१६२ इतकी आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • १० नोव्हेंबरला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (संध्याकाळी ७.३० वाजता)
  • ११ नोव्हेंबरला पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (संध्याकाळी ७.३० वाजता)

उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास

  • पाकिस्तान- भारत विरुध्द विजयी, न्यूझीलंड विरूद्ध विजयी, नामिबिया विरुद्ध विजयी, अफगाणिस्तान विरुद्ध विजयी, स्कॉटलंड विरूद्ध विजयी
  • न्यूझीलंड- पाकिस्तान विरुद्ध पराभव, भारत विरुध्द विजयी, नामिबिया विरुद्ध विजयी, अफगाणिस्तान विरुद्ध विजयी, स्कॉटलंड विरूद्ध विजयी
  • इंग्लंड- वेस्ट इंडिज विरुद्ध विजयी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी, बांगलादेश विरुद्ध विजयी, श्रीलंकेविरुद्ध विजयी, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पराभव
  • ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज विरुद्ध विजयी, इंग्लंड विरुद्ध पराभव, बांगलादेश विरुद्ध विजयी, श्रीलंकेविरुद्ध विजयी, दक्षिण आफ्रिका विरुद्ध विजयी

आतापर्यंत टी २० वर्ल्डकप जिंकलेले संघ

  • भारत २००७
  • पाकिस्तान २००९
  • इंग्लंड २०१०
  • वेस्ट इंडिज २०१२
  • श्रीलंका २०१४
  • वेस्ट इंडिज २०१६

उपांत्य फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाने आतापर्यंत टी २० वर्ल्डकप जिंकलेला नाही. त्यामुळे यंदा नवा विश्वविजेता मिळणार की एक संघ दोनदा चषकावर नाव कोरेल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc semi final team schedule rmt
First published on: 07-11-2021 at 23:14 IST