T20 World Cup : विराटच्या संघ सहकाऱ्याची हॅटट्रीक; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला पराक्रम, पण…

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगा हॅटट्रीक घेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Wanindu_Hasaranga
T20 World Cup : विराटच्या संघसहकाऱ्याची हॅटट्रीक; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला पराक्रम (Photo- T20 WorldCup Twitter)

टी २० वर्ल्डकपमध्ये सामने जसजसे पुढे जात आहेत. तसतसे नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रीक घेतली होती. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगा हॅटट्रीक घेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये हॅटट्रीक घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. तर श्रीलंकेकडून अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज आहे. एकदिवसीय आणि टी २० स्पर्धेत हॅटट्रीक घेणारा चौथा गोलंदाज आहे.

वनिंदूने दोन षटकात हॅटट्रीक पूर्ण केली. १५ षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एडन मारक्रमला त्रिफळाचीत केलं. त्यानंतर १७ षटकाच्या पहिल्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाला निसंकाच्या हाती झेल देत तंबूचा रस्ता दाखवला. तर दुसऱ्या चेंडूवर प्रेटोरिअरला बाद करत हॅटट्रीक पूर्ण केली. मात्र हॅटट्रीक घेऊनही संघाला विजय मिळवून देता नाही. वनिंदू हसरंगाने ४ षटकात २० धावा देत ३ गडी बाद केले.

श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाची हॅटट्रीक

  • १४.६ षटकातील चेंडूवर मारक्रम त्रिफळाचीत
  • १७.१ षटकातील चेंडूवर टेम्बा बावुमा झेलबाद
  • १७.२ षटकातील चेंडूवर ड्वेन प्रेटोरिअस झेलबाद

टी २० वर्ल्डकपमधील सुपर १२ फेरीत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा ४ गडी आणि १ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत. तर श्रीलंकेचं पुढची वाटचाल कठीण झाली आहे. श्रीलंकेनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे दोन सलामीचे फलंदाज चौथ्या षटकात माघारी परतले. क्विंटन डिकॉक १२, तर रीझा हेन्ड्रिक्स ११ धावा करून तंबूत परतला. दुशमंथा चमीराच्या गोलंदाजीवर दोघंही बाद झाले. त्यानंतर रस्सी वॅनदर दुस्सेन धावचीत होत तंबूत परतला. त्याने ११ चेंडूत १६ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा आणि एडन मारक्रम यांनी चांगली खेळी केली. मारक्रम १९ धावांवर असताना वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. तर बवुमा ४६ धावांवर बाद झाला. तर ड्वेन प्रेटोरिअस शून्यावर बाद झाल्याने दडपण आलं होतं. पण शेवटच्या षटकापर्यंत आलेल्या सामन्यात डेविड मिलारने दोन षटकार मारून सामना फिरवला आणि विजय मिळवून दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc srilanka wanindu hasaranga hattrick took agianst sa rmt