T20 World Cup: …अन् ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्यादरम्यान सानिया मिर्झावरुन भारतीयांमध्येच जुंपली

सामना झाला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान. तो जिंकला ऑस्ट्रेलियाने आणि आता सानियावरुन आमने-सामने आलेत भारतीय.

Sania Mirza
सानिया मिर्झा स्मिथला बाद केल्यानंतर टाळ्या वाजून आनंद साजरा करता दिसली

दुबईच्या मैदानामध्ये झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेमधील दुसरा सामना फारच रोमहर्षक झाला. या सामन्याचा कल कोणाच्या बाजूने लागणार? पाकिस्तान दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक देणार की ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा विजय रथ रोखणार याचं उत्तर अगदी सहा चेंडू शिल्लक असताना मिळालं. मात्र तोपर्यंत मैदानामधील क्रिकेट चाहत्यांसोबतच जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याकडे नजर लावून बसल्याचं पहायला मिळालं. एकीकडे हा सामना सुरु असतानाच दुसरीकडे भारतीय मात्र ट्विटवर दुसराच सामना खेळत होते. हा सामना होता सानिया मिर्झाला पाठिंबा देणारे विरुद्ध तिचा विरोध करणाऱ्यांमध्ये.

नक्की वाचा >> दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावल्याने गौतम गंभीर संतापला; म्हणाला, “हे लज्जास्पद असून वॉर्नरने…”

झालं असं की पाकिस्तानी संघाचा सदस्य असणाऱ्या शोएब मलिकची पत्नी आणि भारताची टेनीसपटू सानिया मिर्झा हा उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी दुबईच्या मैदानामध्ये उपस्थित होती.

पाकिस्तानच्या संघाला प्रोत्साहन देताना सानिया अनेकदा कॅमेरात कैद झाली. स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर सानियाने टाळ्या वाजवून व्यक्त केलेला आनंदही कॅमेरामनने अचूक टीपला.

नक्की वाचा >> सकाळी ICU मधून डिस्चार्ज मिळाला अन् संध्याकाळी तो देशासाठी सर्वाधिक धावा करणारा ठरला

भारतीय असून पाकिस्तानला पाठिंबा देणारी सानिया असं म्हणत अनेकांनी तिच्या राष्ट्रीयत्वापासून तिच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करणारे ट्विट केले. काहींनी तर तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली. सामना झाला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान. तो जिंकला ऑस्ट्रेलियाने आणि आता सानियावरुन आमने-सामने आलेत भारतीय, असं चित्र ट्विटरवर पहायला मिळत आहे. पाहुयात काही ट्विट्स…
गुन्हा दाखल करा

मलिकला आनंद झाला असेल

तर काहींनी मात्र ती नवऱ्याला पाठिंबा देत असली तर खेळते भारतासाठी अशी आठवण टीका करणाऱ्यांना करुन दिली.

अनेकांनी सानियाची उपस्थिती मनावर न घेता त्यावरुन मिम्स आणि मजेदार पोस्ट करण्यास सुरुवात केली.

तिच्यासाठी तरी पाकिस्तानला पाठिंबा देऊ

तिच्या सासरी जाणार चषक

नक्की पाहा >> Video: पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने केली विराट, रोहित आणि राहुलची नक्कल; व्हायरल झाला व्हिडीओ

सानियाबद्दल सोशल नेटवर्किंगवर एवढी चर्चा होती की सामना संपल्यानंतर Sania Mirza हा ट्विटरवरील ट्रेण्ड्सपैकी एक होता. यापूर्वही सानिया पाकिस्तानच्या सामन्यांना उपस्थित असल्याचं दिसून आलं होतं. २४ ऑक्टोबरच्या भारत पाकिस्तान सामन्याच्या आधी आपण काही दिवस सोशल मीडियापासून दूर असू असंही तिने स्पष्ट केलेलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc twitter divided after sania mirza cheers for pakistan in semi final clash against australia scsg

ताज्या बातम्या