T20 WC: अनिल कपूरच्या गाण्यावर विराट कोहलीचा ‘झक्कास’ डान्स; व्हिडिओ व्हायरल

टी २० वर्ल्डकपमध्ये भारत अफगाणिस्तान सामन्यातील विराट कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

virat-kohli-m
(Photo-AP)

टी २० वर्ल्डकपमध्ये भारत अफगाणिस्तान सामन्यामधील विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली अनेकदा डान्स करताना दिसला आहे. अफगाणिस्तान भारत सामन्यातही विराट कोहली थिरकला. विराट कोहली अनिल कपूरच्या ‘माय नेम इज लखन’ यावर डान्स करताना दिसला. त्याची डान्स स्टेप पाहताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रीडाप्रेमींनी त्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. यापूर्वी विराट कोहलीने डान्सिंग रिअ‍ॅलिटी शो सुपर डान्सर चॅप्टर ४ मध्ये हजेरी लावली होती. तर अनुष्का शर्मासोबत रोमँटिक डान्स करताना दिसला आहे.

विराट कोहली अफगाणिस्तानच्या फलंदाजीवेळी सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी जात होता. तेव्हा ‘माय नेम इज लखन’ गाणं वाजलं. गाणं ऐकताच विराट कोहली स्वत:ला आवरू शकला नाही आणि नाचू लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

यापूर्वी विराट कोहली २०१६ टी२० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान डान्स करताना दिसला होता. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हाच अंदाज दिसला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा विराट कोहली मैदानात थिरकला.

टीम इंडियाने अखेर आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेमध्ये पहिला विजय नोंदवला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ बुधवारी रात्री अबुधाबीमध्ये अफगाणिस्तान संघाचा पराभव करून फॉर्मात परतला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २ गड्यांच्या मोबदल्यात २१० धावांची मोठी धावसंख्या उभारली. या आव्हानासमोर अफगाणिस्तानचा संघ टिकू शकला नाही आणि २० षटकात ७ विकेट गमावून केवळ १४४ धावाच करू शकला. सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणि विशेषतः कर्णधार विराट कोहलीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc virat kohli dance virat kohli dance video viral rmt

Next Story
ख्रिस गेलचे कौशल्य सर्वोत्तम – मॉर्गन
ताज्या बातम्या