टी २० वर्ल्डकपमध्ये सलग दोन सामने गमवल्यानंतर टीम इंडियावर टीका होत आहे. त्यात तिसऱ्या सामन्यातही विराट कोहलीला नशिबाने साथ दिली नाही. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यातही विराट कोहली नाणेफेकीचा कौल हरला. त्यामुळे भारतीय संघाला पुन्हा एकदा पहिली फलंदाजी करावी लागली. पहिला सामना पाकिस्तानसोबत झाला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकल्याने भारताला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही भारताने नाणेफेकीचा कौल हरला. त्यामुळे पुन्हा प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यानंतर आता अफगाणिस्तानसोबतही भारताने नाणेफेक गमावली आणि पहिली फलंदाजी करावी लागली.

विराट कोहलीने या वर्षी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपद भूषवलं. त्यात १७ वेळा नाणेफेकीचा कौल हरला. विराट कोहलीने नाणेफेकीचा बाबतीत आपलं नशिब साथ देत नसल्याचं मान्य केलं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. काहींनी विराटची तुलना स्किड गेम्सच्या कॅरेक्टरशी केली आहे. तर काही जणांनी मजेशीर मीम्स शेअर केले आहेत.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह.

अफगाणिस्तान: मोहम्मद नबी (कर्णधार), हजरतुल्ला झाझाई, मोहम्मद शहजाद (यष्टीरक्षक), रहमानउल्लाह गुरबाज, नजीबुल्ला झादरान, करीम जनात, राशिद खान, गुलबदिन नैब, नवीन-उल-हक, हमीद हसन, शराफुद्दीन अश्रफ.