scorecardresearch

T20 WC: पाकिस्तान विरुद्ध खेळताना विराट कोहलीचा नवा विक्रम; सर्वाधिक…

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.

T20 WC: पाकिस्तान विरुद्ध खेळताना विराट कोहलीचा नवा विक्रम; सर्वाधिक…
T20 WC: पाकिस्तान विरुद्ध खेळताना विराट कोहलीचा नवा विक्रम (Photo- BCCI)

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. एकीकडे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर सन्मानजनक धावसंख्या उभारण्याची जबाबदारी कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर आली होती. मात्र विराटने तणावपूर्ण सामन्यात आपल्या सर्वोत्तम खेळीचं प्रदर्शन केलं. या सामन्यात विराटने ४९ चेंडूत ५७ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करुन दिली. त्याचबरोबर विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाच तुरा खोवला गेला आहे. विराटने टी २० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकवण्याचा मान पटकावला आहे. विराटने आतापर्यंत १० अर्धशतकं झळकावली आहेत.

विराट कोहलीच्या आधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर होता. त्याने एकूण ९ अर्धशतकं झळकावली असून या वर्ल्डकपमध्ये खेळत आहे. तर तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा महिला जयवर्धने असून त्याने ७ अर्धशतकं झळकावली आहे. त्यानंतर श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान आणि भारताच्या रोहित शर्माने प्रत्येकी ६ अर्धशतकं झळकावली आहेत.

दुसरीकडे, टी २० वर्ल्डकपमध्ये विराट कोहली पहिल्यांदाज पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात बाद झाला आहे. यापूर्वीच्या सामन्यात विराट कोहलीला बाद करण्यात पाकिस्तान संघाला अपयश आलं होतं.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी .

पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, आसिफ अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरीस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 21:24 IST

संबंधित बातम्या