T20 WC: विराट कोहलीचं जुनं ट्वीट शेअर करत पाकिस्तानी ट्रोलर्सनी साधला निशाणा; “उद्या घरी जात आहे…”

उपांत्य फेरीचं स्वप्न भंगल्यानंतर विराट कोहलीचं जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Virat_Kohli
T20 WC: विराट कोहलीचं जुनं ट्वीट शेअर करत पाकिस्तानी ट्रोलर्सनी साधला निशाणा; "उद्या घरी जात आहे…" (Photo- Twitter)

टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचं आव्हान सुपर १२ फेरीत संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागल्यानंतर उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभवाचं तोंड पाहावं लागल्यानंतर ट्रोलर्सनी विराट कोहलीवर निशाणा साधला होता. आता उपांत्य फेरीचं स्वप्न भंगल्यानंतर विराट कोहलीचं जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने २० मार्च २०१२ ला आशिया कप दरम्यान एक ट्वीट केलं होतं. “उद्या घरी जात आहे, चांगलं वाटत नाही”, असं ट्वीट विराट कोहलीने केलं होतं.

जुनं ट्वीट शेअर करत पाकिस्तानी ट्रोलर्स विराट कोहलीवर निशाणा साधत आहेत. ट्वीटला लाइक्स आणि रिट्वीट करत कमेंट्स देत आहेत. पाकिस्तानी ट्रोलर्स या वर्षीच्या टी २० वर्ल्डकपशी याचं नात जोडत आहेत.

विराट कोहलीने टी २० वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं आहे. त्यामुळे टी २० क्रिकेटमधला विराट कोहलीचा नामिबिया विरुद्धचा शेवटचा सामना आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत यश मिळवण्यात अपयश आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc virat kohli troll by old tweet rmt

Next Story
ख्रिस गेलचे कौशल्य सर्वोत्तम – मॉर्गन
ताज्या बातम्या