टी-२० विश्वकरंडक २०२१ स्पर्धेत टीम इंडिया आज आपला दुसरा सामना न्यूझीलंडसोबत खेळणार आहे. सुपर १२ मधील हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांनी आपापला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध गमावला. त्यामुळे उपांत्य फेरीतील शर्यत कायम राखण्यासाठी विराट-विल्यमसन विजयाचा पुरेपूर प्रयत्न करतील.

टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडिया अद्याप एकदाही न्यूझीलंडला पराभूत करु शकलेली नाही. त्याचबरोबर या सामन्यात नाणेफेक देखील निर्णायक ठरणार आहे. ग्रुप २ मध्ये पाकिस्तानचा संघ सलग तीन विजयासह अव्वल क्रमांकावर आहे. त्यांची उपांत्य फेरीतील जागा ही नक्की झाली आहे. दुसऱ्या स्थानासाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तीन संघांत स्पर्धा आहे.

कुठे रंगणार सामना?

भारत-न्यूझीलंडमधील हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर रंगणार आहे.

किती वाजता सुरू होणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. तर टॉस सात वाजता होईल.

कुठे होणार लाइव्ह प्रसारण?

या सामन्याचे लाइव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

हेही वाचा – BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं ‘मोठं’ वक्तव्य; म्हणाला, ‘‘भारत-न्यूझीलंड…”

लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे.

सामन्याचे लाइव्ह अपडेट कुठे वाचता येतील?

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे लाइव्ह अपडेट तुम्ही https://www.loksatta.com/krida/ येथे वाचू शकता.

दोन्ही संघ

भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कप्तान) सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कप्तान), टोड अ‍ॅस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे, मार्टिन गप्टिल, काईल जेमीसन, डॅरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम सेफर्ट, ईश सोधी आणि टीम साउदी.