एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली ही चारही जेतेपदे CSK ने जिंकली आहेत. एमएस धोनीने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ चे विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान, धोनी पुढील आयपीएल खेळेल की नाही याविषयी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, केएल राहुलचा असा विश्वास आहे की धोनी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो खेळू शकतो. 

इंग्लंड विरुद्ध सराव सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर केएल राहुलने धोनीबाबत मोठं वक्तव्य केले आहे. केएल राहुल यांनी माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचे खूप कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की एमएस धोनी अजूनही कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला कठीण टक्कर देऊ शकतो. केएल राहुलच्या म्हणण्यानुसार ४० वर्षांचा असूनही एमएस धोनी एका तरुणाप्रमाने लांब षटकार मारू शकतो.

एका कार्यक्रमादरम्यान केएल राहुल म्हणाला, “मला वाटते की एमएस धोनी आपल्यापैकी कोणालाही कठीण टक्कर देऊ शकतो. तो एक असा खेळाडू आहे जो चेंडू खूप वेगाने मारण्यात माहिर आहे. तो खूप मजबूत आहे आणि विकेट दरम्यान खूप वेगाने धावा करतो.”

जेव्हा तो कर्णधार होता…

एमएस धोनी भारतीय संघाचा मार्गदर्शक झाल्याबद्दल देखील केएल राहुलनेही प्रतिक्रिया दिली, तो म्हणाला, “महेंद्रसिंग धोनीचे संघात पुनरागमन होणे नक्कीच चांगले आहे कारण आम्ही त्याच्या अंतर्गत खेळलो आहोत आणि तो कर्णधार असतानाही आम्ही त्याच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहत होतो. जेव्हा तो कर्णधार होता, तेव्हा ड्रेसिंग रूममधील प्रत्येकजण त्याचा खूप आदर करायचा.”