T20 WC: “…तर मी ते आनंदाने करेन”, क्विंटन डी कॉकचा माफीनामा; आता गुडघ्यावर बसण्यास तयार

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून डी कॉकला वगळण्यात आलं होतं.

t20 world cup 2021 quinton de kock apologises pledges to take the knee?
क्विंटन डी कॉकचा वर्णद्वेषी मोहिमेला पाठिंबा

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील खेळाडू क्विंटन डी कॉकने ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा दर्शवत गुडघा टेकून बसण्यास नकार दिला. यासाठी त्याने टी-२० विश्वचषकातील विंडीजविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली. पण आता त्याने याबाबत माफी मागितली आहे. या चांगल्या मोहिमेसाठी यापुढे तो गुडघा टेकवून या मोहिमेला पाठिंबा देणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात क्विंटन डी कॉकने ‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’साठी गुडघा टेकवण्यास नकार दिला आणि याच कारणामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले. ‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ या वर्णद्वेषविरोधी मोहिमेसाठी गुडघा टेकण्याची बोर्डाची घोषणा वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी आली आणि अचानक डी कॉकने स्वतःला या सामन्यासाठी अनुपलब्ध घोषित केले. नंतर असे वृत्त आले, की डी कॉकने मोहिमेला पाठिंबा न दिल्याने त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही.

हेही वाचा – हरभजन ट्विटरवरच टीम इंडियाची मस्करी करणाऱ्या पत्रकाराला भिडला, म्हणाला…!

डी कॉकने आता या संपूर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. त्याने माफी मागून सुरुवात केली, “मी माझ्या सहकारी खेळाडूंची आणि सर्व चाहत्यांची माफी मागतो. मला याला कधीच मोठा मुद्दा बनवायचा नव्हता. मला वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवण्याचे महत्त्व चांगलेच माहीत आहे. एक खेळाडू म्हणून आमच्यावर मोठी जबाबदारी आहे”, असे डी कॉकने म्हटले.

डी कॉक म्हणाला, “माझा गुडघा टेकण्याने लोकांमध्ये जागरूकता पसरली, तर मी ते आनंदाने करेन. वेस्ट इंडिजविरुद्ध न खेळून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. त्याबद्दल मी माफी मागतो. बोर्डासोबत माझे भावनिक संभाषण झाले होते. मला वाटते ते आधी घडले असते तर बरे झाले असते. कारण सामन्याच्या दिवशी हे घडायला नको होते.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup 2021 quinton de kock apologises pledges to take the knee adn

Next Story
विश्वचषक.. पाकिस्तान आणि विराट
ताज्या बातम्या