T20 WC : पाकिस्तान की ऑस्ट्रेलिया?, ब्रायन लाराचं ‘या’ संघाला मत; आधीची भविष्यवाणी ठरलीय खरी!

पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यासाठी लारानं न्यूझीलंडला फेव्हरिट म्हटलं होतं. न्यूझीलंडनं इंग्लंडला हरवत फायनलमध्ये धडक दिली.

t20 world cup 2021 semifinal ausralia vs pakistan brian lara predicts match winner
ब्रायन लारा

जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराने भविष्यवाणी केली आहे. टी-२० विश्वचषक-२०२१ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील विजेत्या संघाबाबत लाराने प्रतिक्रिया दिली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा ५ विकेट्स राखून पराभव करून प्रथमच विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला.

लाराने ट्वीट केले, ”ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना, या सामन्यासाठी माझे मत पाकिस्तानला आहे. ऑस्ट्रेलिया हा धोकादायक संघ आहे. त्याच्याकडे मजबूत फळी आहे जी कोणत्याही संघाला पराभूत करू शकते. पाकिस्तानकडे उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज आहेत जे संघाला अंतिम फेरीत नेऊ शकतात.”

याआधी लाराने न्यूझीलंड आणि इंग्लंड सामन्यातील विजेत्याबाबतही भविष्यवाणी केली होती. त्याने आधीच न्यूझीलंडला विजयाचा दावेदार सांगितले होते. लाराचा तो अंदाज खरा ठरला आणि न्यूझीलंडने इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत धडक मारली.

हेही वाचा – PAK VS AUS : सेमीफायनलपूर्वी पाकिस्तानच्या गोटात आनंदाचं वातावरण; भारताच्या जावयासह ‘हा’ खेळाडू…

काल १० नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६६ धावा केल्या होत्या. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर न्यूझीलंडने हे लक्ष्य १९ षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केले. न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरिल मिचेलने ४७ चेंडूत ७२ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने विजयी चौकार ठोकले आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याच्याशिवाय डेव्हॉन कॉन्वेने ३८ चेंडूत ४६ आणि जेम्स नीशमने ११ चेंडूत २७ धावा केल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup 2021 semifinal ausralia vs pakistan brian lara predicts match winner adn

ताज्या बातम्या