T20 WC: अरेरे..! अवघ्या ४४ धावांत नेदरलँड्सचा पालापाचोळा!

या विजयासह ग्रुप एमध्ये श्रीलंका अव्वल स्थानी आहे.

t20 world cup 2021 sri lanka beat netherlands by 8 wickets
श्रीलंकेची नेदरलँड्सवर मात

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या १२व्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा पालापाचोळा करत ८ गड्यांनी सहज विजय नोंदवला आहे. या विजयासह श्रीलंका ग्रुप एमध्ये तीन सामन्यात तीन विजयासह अव्वल स्थानी आहे. शारजाह मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या माऱ्यासमोर दुबळा नेदरलँड्स संघ टिकाव धरू शकला नाही. १० षटकात अवघ्या ४४ धावांवर नेदरलँड्स सर्वबाद झाला.

टी-२० विश्वचषकात नेदरलँड संघ दुसऱ्यांदा ५०च्या आत सर्वबाद झाला आहे. याआधी २०१४च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध तो ३९ धावांवर सर्वबाद झाला होता. नेदरलँड्सकडून अकरमनला (११) फक्त दुहेरी आकडा गाठता आला. लंकेकडून लहिरू कुमारा आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

हेही वाचा – T20 WC: ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नामिबियाचा ‘तो’ खेळाडू आधी विराटच्या संघातून खेळायचा!

प्रत्युत्तरात लंकेला ही धावसंख्या गाठताना दोन धक्के बसले. दुसऱ्याच षटकात ब्रेंडन ग्लोवरने लंकेचा सलामीवीर पाथुम निसांकाला शून्यावर बाद केले. त्यानंतर सहाव्या षटकात चरिथ असलांका बाद झाला. दुसरा सलामीवीर कुसल परेरा (नाबाद ३३) आणि अविष्का फर्नांडोने आठव्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले. लंकेचा गोलंदाज लहिरू कुमाराला सामनावीर पुरस्कार मिळाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup 2021 sri lanka beat netherlands by 8 wickets adn

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या