T20 World Cup 2021 : सलग तिसऱ्या विजयासाठी इंग्लंड-ऑस्ट्रेलियात झुंज

सलग दोन लढती जिंकल्यामुळे विजयी हॅट्ट्रिक साकारण्याच्या निर्धाराने उभय संघाचे खेळाडू मैदानात उतरतील.

दुबई : जेतेपदाचे दोन प्रबळ दावेदार मानले जाणारे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे कट्टर प्रतिस्पर्धी शनिवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या ‘अव्वल-१२’ फेरीत आमनेसामने येतील. सलग दोन लढती जिंकल्यामुळे विजयी हॅट्ट्रिक साकारण्याच्या निर्धाराने उभय संघाचे खेळाडू मैदानात उतरतील.

पहिल्या गटात अग्रस्थानी असणाऱ्या ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने अनुक्रमे वेस्ट इंडिज आणि बांगलादेशला धूळ चारली. जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर या धडाकेबाज फलंदाजांचे त्रिकूट इंग्लंडसाठी मोलाची भूमिका बजावत आहे.

दुसरीकडे आरोन फिंचच्या ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आनंदाची बाब म्हणजे सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला गवसलेला सूर. आफ्रिका, श्रीलंकेवर वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा हुकमी एक्का ठरत आहे.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup 2021england australia clash for third consecutive victory zws

ताज्या बातम्या