scorecardresearch

Premium

T20 World Cup 2024: १० संघ, २७ दिवस ‘या’ तारखेपासून सुरु होणार टी२० विश्वचषक २०२४! वेस्ट इंडिज आणि US असणार संयुक्त यजमान

T20 World Cup 2024: ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे या मेगा इव्हेंटचे आयोजन करणार आहेत. तब्बल २७ दिवस क्रिकेटचा हा रणसंग्राम चालणार आहे.

T20 World Cup will run for 27 days in June 2024 West Indies will host These grounds of US shortlist
ICC T20 विश्वचषक२०२४ स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)

ICC T20 World Cup 2024 Host Country, Dates: टी२० वर्ल्ड कपची नववी आवृत्ती वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. या स्पर्धेचे सामने पहिल्यांदाच अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजमध्ये दुसऱ्यांदा ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. २०१० मध्ये, त्यांना या टी२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. त्या विश्वचषकात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यात पराभव करून पहिल्यांदा टी२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळे पुन्हा २४ वर्षांनी वेस्ट इंडीजला हा यजमानपदाचा बहुमान मिळाला आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडीज आणि अमेरिका संयुक्तरित्या हे यजमानपद भूषवणार असून जूनमध्ये हा विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. २७ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहेत.

ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या मते, टी२० विश्वचषक ४ जूनपासून सुरू होणार आहे. त्याच वेळी, अंतिम सामना ३० जून रोजी होणार आहे. आयसीसीच्या शिष्टमंडळाने या आठवड्यात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधील पाच निवडक ठिकाणांना भेट दिली. यामध्ये मॉरिसविले, डल्लास, न्यूयॉर्क आणि फ्लोरिडामधील लॉडरहिल या ठिकाणी स्पर्धेतील सामने आणि सरावासाठीची मैदाने ठरवण्यात येतील.

19th asian games 2023 updates
Asian Games: भारत-बांगलादेश सेमीफायनल सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार? जाणून घ्या
19th Asian Games Updates
Asian Games: भारतीय क्रिकेट संघ ॲथलीट्स व्हिलेजमध्ये दाखल, उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळण्यासाठी उतरणार मैदानात
IND vs AUS 1st ODI Match Updates
IND vs AUS: के. एल. राहुलने मार्नस लाबुशेनला धावबाद करण्याची संधी गमावल्याने सोशल मीडियावर ट्रोल, पाहा VIDEO
Zaheer Khan on aus team and World Cup 2023 and
World Cup 2023: इतर संघांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात अधिक फायदा का होणार? झहीर खानने सांगितले कारण

पुढील महिन्यात आयसीसी अंतिम निर्णय घेईल

मॉरिसविले आणि डल्लास मेजर लीग क्रिकेटची पहिली आवृत्ती खेळत आहेत. मात्र, या मैदानांना अद्याप आंतरराष्ट्रीय स्थळाचा दर्जा मिळालेला नाही, जो आयसीसीच्या नियमांनुसार अनिवार्य आहे. पुढील काही महिन्यांत, आयसीसी क्रिकेट वेस्ट इंडिज (CWI) आणि USA क्रिकेट (USAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकाणांबाबत अंतिम निर्णय घेईल.

हेही वाचा: ENG vs AUS: जो रूटने स्लिपमध्ये डायव्हिंग करत एका हाताने पकडला अप्रतिम झेल, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

१५ संघांना वर्ल्डकपमध्ये मिळणार संधी

आतापर्यंत १५ संघांची ठिकाणे निश्चित झाली आहेत. पाच जागा रिक्त आहेत. भारतातील आयपीएलनंतर जूनमध्ये ही स्पर्धा होणार आहे. २०२२च्या टी२० विश्वचषकातील आठ संघांना पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळाला आहे. त्याचबरोबर उर्वरित दोन टॉप-१० संघांनाही आयसीसी क्रमवारीत स्थान मिळाले आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला यजमान म्हणून खेळण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे १२ संघ आधीच ठरलेले होते. आता पात्रता फेरीतून आठ संघ निवडले जात आहेत. त्या आठपैकी पाच संघांना या २० संघांच्या यादीत स्थान मिळवू शकतील. त्यानंतर पात्रता फेरीतून या २० पैकी सर्वोतम १० संघ मुख्य विश्वचषकाच्या स्पर्धेत सहभागी होतील.

पात्रता फेरीतून तीन संघांना स्थान मिळाले आहे

पापुआ न्यू गिनी, आयर्लंड आणि स्कॉटलंड यांनी पात्रता फेरीतून टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. अशा प्रकारे १५ संघ निश्चित करण्यात आले आहेत. आता पाच जागा शिल्लक आहेत. यासाठी, अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या तीन खंडातील संघ असणे आवश्यक आहे. अमेरिकेचा एक संघ, आशिया आणि आफ्रिकेतील प्रत्येकी दोन संघांना यात स्थान मिळेल.

हेही वाचा: Los Angeles Olympics: तब्बल १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचं होऊ शकते पुनरागमन! केवळ ५ संघांना संधी, भारताचा नंबर लागणार का?

हे संघ पात्र ठरले आहेत

आतापर्यंत, यजमान वेस्ट इंडिज आणि यूएसए व्यतिरिक्त, भारत, इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, आयर्लंड, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांनी टी२० विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: T20 world cup 2024 dates revealed west indies and america will host avw

First published on: 29-07-2023 at 13:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×