टी-२० विश्वचषक २०२२ विश्वचषक पार पडून फक्त एक आठवडा झाला आहे. परंतु आयसीसीने आता टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेच्या यजमान देशांपासून ते संघांच्या फॉर्मेट आणि संख्येपर्यंत सर्व काही ठरले आहे. २०२४ मध्ये होणारा टी-20 विश्वचषक २०२२ पेक्षा खूप वेगळा असेल. आयसीसीने सांगितले आहे की २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होतील आणि स्पर्धेचे स्वरूप देखील पूर्वीपेक्षा वेगळे असणार आहे. अमेरिकेला प्रथमच आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे.

टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील बाद फेरीचे सामने सुरू होण्यापूर्वी दोन टप्पे असतील. २०२१ आणि २०२२ च्या टी-२० विश्वचषकाचे देखील उपांत्य फेरीपूर्वी दोन टप्पे होते, ज्यात पात्रता फेरी आणि सुपर-१२ टप्पा समाविष्ट होते, परंतु आता असे होणार नाही.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार
indian squad for t20 world cup
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघनिवड एप्रिल अखेरीस?

यावेळी या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात पाच संघ असतील, जे आपापसात खेळतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर -८ फेरीत प्रवेश करतील. येथे आठ संघ दोन गटात विभागले जातील. प्रत्येक गटात चार संघ असतील. येथे दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

मात्र, या स्पर्धेसाठी सर्व २० संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत. सध्या यजमान म्हणून वेस्ट इंडिज आणि अमेरिका या विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. यानंतर २०२२ विश्वचषकातील चांगल्या कामगिरीच्या जोरावर आणि १४ नोव्हेंबर रोजी आयसीसी क्रमवारीत १० अन्य संघांनी स्पर्धेत स्थान मिळवले आहे.

टी-२० विश्वचषक २०२४ साठी १२ संघ निश्चित –

टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिल्या आठ क्रमांकावरील संघ २०२४ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये इंग्लंड, पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि नेदरलँड या संघांचा समावेश आहे. यानंतर १४ नोव्हेंबर रोजी आयसीसी टी-२० क्रमवारीत चांगल्या स्थानाच्या आधारे बांगलादेश आणि अफगाणिस्ताननेही या स्पर्धेत स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि अमेरिका संघांचा यजमान देश म्हणून समावेश आहे.

हेही वाचा – Video: सामन्याच्या १० व्या मिनिटाला मेस्सीने केलेला अप्रतिम गोल पाहिलात का? FIFA World Cup मध्ये नोंदवला विक्रम

टी-२० विश्वचषक २०२४ साठी १२ संघ निश्चित करण्यात आले आहेत. आता आठ संघ उरले आहेत. या आठ संघांची नावे अद्याप ठरलेली नाहीत. प्रत्येक क्षेत्राच्या आधारे हे संघ विश्वचषकात प्रवेश करतील. या दोन वर्षांत पात्रता फेरीचे सामने सुरू राहतील आणि येथे प्रत्येक विभागातील सर्वोत्तम कामगिरी करणारे संघ टी-२० विश्वचषकात प्रवेश करतील.