T20 WC 2026 Semi Final Schedule: टी-२० विश्वचषक २०२६ आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदाची टी-२० वर्ल्डकप ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी अखेरचे ४ संघ निश्चित झाले आहेत. सुपर-८ करता आठ संघांना दोन गटांत विभागलं होतं. त्यापैकी दोन्ही गटातील टॉप-२ संघ आता सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. आता सेमीफायनलचे सामने कधी, कुठे आणि केव्हा होणार जाणून घेऊया.
टी-२० विश्वचषक २०२६ साठी तीन संघ आधीच ठरले होते. इंग्लंड सर्वात आधी क्वालिफाय झाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पात्रता मिळवली आणि पाकिस्तान गणितीय समीकरणांनुसार विजय मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर न्यूझीलंडने सेमीफायनल गाठली. त्यानंतर आता चौथा सेमीफायनलचा संघ ठरला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. यासह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि भारत हे संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत.
इंग्लंडचा संघ सर्वात आधी टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरला. इंग्लंडने श्रीलंका आणि पाकिस्तानविरूद्धचे सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत सेमीफायनलसाठी पात्रता मिळवली. यासह इंग्लंड संघाने तिन्ही सामने जिंकत ब गटात ६ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर अ गटात दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन सामने जिंकत सेमीफायनलसाठी पात्र ठरला आणि सुपर-८मधील तिन्ही सामने जिंकले. त्यानंतर पाकिस्तानचा संघ गणितीय समीकरणांनुसार श्रीलंकेविरूद्ध जिंकू शकला नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला. यानंतर भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत सेमीफायनलसाठी पात्रता मिळवली.
टी-२० विश्वचषक २०२६मधील पहिला उपांत्य सामना बुधवारी (४ मार्च) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. हा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. दुसरा उपांत्य सामना ५ मार्च २०२६ रोजी इंग्लंड आणि भारत यांच्यात होईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही उपांत्य सामन्यांसाठी राखीव दिवस आहे. अंतिम सामना ८ मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होतील.
टी-२० वर्ल्डकप २०२६ चं वेळापत्रक
पहिली सेमीफायनल – ४ मार्च २०२६ – न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता
दुसरी सेमीफायनल – ५ मार्च २०२६ – भारत वि. इंग्लंड, मुंबई</p>
भारत आणि इंग्लंड सलग तिसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये भिडणार
भारत आणि इंग्लंड सलग तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीत आमनेसामने येतील. २०२२ मध्ये इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. २०२४ मध्ये भारताने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव केला. २०२२ मध्ये इंग्लंडने स्पर्धा जिंकली आणि २०२४ मध्ये भारताने स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे यंदा सेमीफायनलमध्ये कोण बाजी मारणार यावर सर्वांच्या नजरा असतील.
