scorecardresearch

‘मेंटॉर’सिंह धोनी..! कॅप्टन कूलची पुन्हा एकदा टीम इंडियात एन्ट्री; पाहा फोटो

BCCIनं आपल्या राजाचे स्वागत करत फोटो शेअर केले आहेत.

t20 world cup bcci welcomes ms dhoni in team and shares photo
भारतीय संघात परतला धोनी

आजपासून टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारी टीम इंडिया पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही भारतीय संघासोबत जोडला गेला आहे. धोनी स्पर्धेदरम्यान संघासाठी मेंटॉरची भूमिका साकारणार आहे. दोन दिवसांपूर्वीच धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१चे जेतेपद पटकावले. या मोठ्या कामगिरीनंतर धोनीने भारतीय संघात प्रवेश केला आहे.

बीसीसीआयने धोनीचे भारतीय संघाच्या प्रशिक्षकांसोबतचे दोन फोटो शेअर केले. ”किंगचे स्वागत. नव्या भूमिकेत महेंद्रसिंह धोनी टीम इंडियात परतला आहे”, असे बीसीसीआयने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला हरवले. तीन दशकात विजेतेपद जिंकणारा धोनी आयपीएलमधील एकमेव कर्णधार ठरला.

हेही वाचा – भारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगची अटकेनंतर सुटका!

धोनीने वर्ल्डकपसाठी कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा पैसे घेतलेले नाही. भारताने २००७ मध्ये फक्त टी-२० विश्वचषक जिंकला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने २००७ टी-२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल.

मार्गदर्शक: महेंद्रसिंह धोनी

भारताचे टी-२० विश्वचषकातील सामने

  • २४ ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
  • ३१ ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड
  • ३ नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
  • ५ नोव्हेंबर: भारत विरुद्ध B1
  • ८ नोव्हेंबर: भारत विरुद्ध A2

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-10-2021 at 22:17 IST