T20 WC : बाप रे बाप..! न्यूझीलंडचा खेळाडू बनला ‘सुपरमॅन’ अन् घेतला अफलातून कॅच; पाहा VIDEO

‘त्याला’ उडताना पाहून आऊट झालेला पाकिस्तानचा फलंदाजही झाला थक्क!

t20 world cup devon conway takes unbelievable catch against pakistan
डेव्हॉन कॉन्वेने घेतला अप्रतिम झेल

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात एक जबरदस्त झेल पाहायला मिळाला. न्यूझीलंडचा क्षेत्ररक्षक डेव्हॉन कॉन्वेने हवेत अप्रतिम झेप घेत मोहम्मद हाफिजचा झेल टिपला. त्याच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूझीलंड संघ उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. तत्पूर्वी सराव सामन्यात मार्टिन गप्टिलने सर्वोत्तम झेल घेत डेव्हिड वॉर्नरला बाद केले होते.

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज हाफिजने न्यूझीलंडचा फिरकीपटू सँटनरला लॉग ऑफच्या दिशेने मोठा फटका मारला. चेंडू वेगाने सीमारेषेबाहेर जात होता, पण कॉन्वेने चपळता दाखवली. त्याने धावत जात आपल्या डाव्या बाजूला झेप घेत चेंडू पडकला. त्याच्या झेलमुळे पाकिस्तान संघ अडचणीत गेला. ४० वर्षीय हाफिज ११ धावांवर तंबूत परतला. त्याने आपल्या खेळीत एक षटकार ठोकला. सोशल मीडियावर कॉन्वेच्या या झेलचे खूप कौतुक होत आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताविरुद्ध संस्मरणीय विजय नोंदवल्यानंतर पाकिस्तानने शारजाहवर न्यूझीलंडला ५ गड्यांनी मात दिली आहे. न्यूझीलंडने नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यातून अखेरच्या क्षणी माघार घेतली होती, पण आज पाकिस्तानाने आज न्यूझीलंडला हरवत नाचक्कीचा वचपा काढला आहे.

हेही वाचा – “हिंदूंमध्ये उभं राहून…”, पाकिस्तानच्या वकार यूनुसचं ‘ते’ वक्तव्य ऐकल्यानंतर वेंकटेश प्रसाद भडकला; म्हणाला, “किती निलाजरा..”

पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परिस्थिती आणि खेळपट्टीच्या अभ्यासानुसार गोलंदाजी करत पाकिस्तानने न्यूझीलंडला २० षटकात ८ बाद १३४ धावांवर रोखले. शारजाहच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी यांनी किवी फलंदाजांना फटकेबाजी करू दिली नाही. रौफने चार बळी घेतले. प्रत्युत्तरात संथ खेळपट्टीवर पाकिस्तानने आपले आपले पाच गडी गमावले. पण अनुभवी शोएब मलिक आणि आसिफ अली यांनी आक्रमक खेळी करत १९व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले. रौफला सामनावीर पुरस्कार मिळाला. या विजयासह पाकिस्तानने गट-२मध्ये पहिले स्थान मिळवले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup devon conway takes unbelievable catch against pakistan adn

Next Story
इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ सामना
ताज्या बातम्या