भारतात होणारा टी २० वर्ल्डकप करोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आला आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि यूएईत खेळली जाणार आहे. यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. या स्पर्धेस्ठी १५ खेळाडू आणि ८ अधिकाऱ्यांना आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच खेळाडू आणि अधिकाऱ्यांची यादी १० सप्टेंबरपर्यंत देण्यास सांगितलं आहे.

“आयसीसीने करोना आणि बायो बबलची स्थिती पाहता टी २० स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना अतिरिक्त खेळाडू आणण्याची परवानगी दिली आहे. मात्र याचा खर्च संबंधित क्रिकेट मंडळाला करावा लागणार आहे. आयसीसी फक्त १५ खेळाडू आणि ८ अधिकाऱ्यांचा खर्च उचलणार आहे”, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितलं.

…म्हणून टाटा ‘त्या’ १५ खेळाडूंना भेट देणार Altroz कार; कारण वाचून अभिमान वाटेल

टी २० वर्ल्डकपसाठी पात्रता फेरीचे सामने २३ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत. या पात्रता फेरीत श्रीलंका, आयर्लंड आणि बांगलादेश हे संघ सहभागी होणार आहे. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या पात्रता फेरीतून चार संघ सुपर-१२ साठी पात्र ठरणार आहेत. २०१६ नंतरचा हा पहिला टी-२० वर्ल्डकप असेल. त्यावेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते. सुपर-१०च्या गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. उपांत्य सामन्यात भारताला विंडीजकडून पराभवाला सामोरे जावे लागले.