scorecardresearch

Premium

T20 World Cup: आयर्लंडची नेदरलँडवर ७ गडी राखून मात

टी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत आयर्लंडने ७ गडी आणि २९ चेंडू राखून नेदरलँडला पराभूत केलं आहे.

Ireland_Won
T20 World Cup: आयर्लंडची नेदरलँडवर ७ गडी राखून मात (Photo- Twitter Cricket Ireland)

टी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत आयर्लंडने ७ गडी आणि २९ चेंडू राखून नेदरलँडला पराभूत केलं आहे. नेदरलँडने २० षटकात सर्वबाद १०७ धावांचं आव्हान विजयासाठी आयर्लंडसमोर ठेवलं होतं. आयर्लंडने हे आव्हान १५ षटकं आणि एक चेंडूत ३ गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने हॅटट्रीक घेतली आहे. त्याच्या या कामगिरीने क्रीडाप्रेमींच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने ४ षटकात २६ धावा देत ४ गडी बाद केले आहेत. विशेष म्हणजे एका षटकात ४ गडी बाद करण्याचा भीमपराक्रम कार्टिस कॅम्फरनं केला आहे. यासह यंदाच्या टी २० विश्वचषकातील पहिलीवहिली हॅटट्रीक घेण्याचा मान कॅम्फरला मिळाला आहे.

आयर्लंडचा डाव
नेदरलँडने विजयासाठी दिलेल्या १०७ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने सावध सुरुवात केली. पॉल स्टिरलींग आणि केविन ऑब्रायन यांनी पहिल्या गड्यासाठी २७ धावांची भागीदारी केली. मात्र ग्लोव्हरच्या गोलंदाजीवर केविनला आपली विकेट सांभाळता आली नाही. त्याच्या गोलंदाजीवर लोगान ब्रीक झेल घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या अँड्र्यु बालविरनीही चांगली कामगिरी करू शकला नाही अवघ्या ८ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी पॉल आणि गॅरेथ डेलनी यांची जोडी जमली. त्यांनी संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. गॅरेथ ४४ धावांवर असताना पीटर सीलारच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पॉल आणि कर्टिस कॅम्परनं विजयी धावा केल्या.

Gambhir Praises Dhoni Ahead Of World Cup 2023
MS Dhoni: ‘मला वाटत नाही…’; माहीच्या नेतृत्वाबद्दल गंभीरचं पुन्हा एकदा विश्वचषकापूर्वी मोठं वक्तव्य, पाहा VIDEO
World Cup 2023 Updates
World Cup 2023: विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे ॲश्टन अगर स्पर्धेतून बाहेर
World Cup 2023: Will Virat Kohli retire from ODI and T20 after the World Cup Big claim from a close friend AB de Villiers
AB de Villiers: वर्ल्डकपनंतर विराट कोहली वन डे आणि टी२० मधून निवृत्ती घेणार? एबी डिव्हिलियर्सने केला मोठा दावा
Zaheer Khan on aus team and World Cup 2023 and
World Cup 2023: इतर संघांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात अधिक फायदा का होणार? झहीर खानने सांगितले कारण

नेदरलँडचा डाव
टी २० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत नेदरलँड विरुद्ध आयर्लंड सामन्यात नेदरलँडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र नेदरलँडची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बेन कुपर हा खातं न खोलता धावचीत होत माघारी परतला. त्यामुळे संघावरील दडपण वाढलं. त्यानंतर मॅक्स ओडॉउड आणि बॅस दी लीडे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र संघाची धावसंख्या २२ असताना बॅस दी लीडे अवघ्या ७ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी एकरमॅन आणि मॅक्स ओडॉउड डाव सावरला. मात्र कॅम्फरनं एकरमॅनला बाद केल्यानंतर फलंदाज बाद होण्याची रांग लागली. सलग चार खेळाडू बाद झाले. संघाची धावसंख्या ८८ असताना मॅक्स ओडॉउड ५१ धावा करून बाद झाला. कर्णधार पीटर सीलार आमि लोगन वॅन बीकनं डाव सावरला. मार्क एडरच्या गोलंदाजीवर पीटर सीलार २१ धावा करून बाद झाला. लोगान बीक ११ धावा करून माघारी परतला. शेवटच्या षटकातला शेवटच्या चेंडूवर ब्रँडन ग्लोव्हर खातं न खोलता बाद झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: T20 world cup ireland beat netherlands by 7 wickets rmt

First published on: 18-10-2021 at 18:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×