आज फक्त आणि फक्त भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची चर्चा सर्वत्र आहे. दुबईच्या मैदानावर थोड्या वेळेत दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. टी-२० विश्वचषकाचा हा सर्वात मोठा सामना आहे. दोन्ही देशांचे चाहते आणि माजी दिग्गज क्रिकेटपटू आपापल्या संघांबाबत प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांनीही पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, या सामन्यापूर्वी इम्रान खानच्या कार्यालयातून एक निवेदन जारी करण्यात आले होते. यामध्ये भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानी संघाच्या विजयाची आशा व्यक्त करण्यात आली आहे. इम्रान खान यांनी निवेदनात म्हटले, ”या संघात भारताला हरवण्याची प्रतिभा आहे. इंशाअल्लाह पाकिस्तान संघ या सामन्यात भारतीय संघाला नक्कीच पराभूत करेल.”

Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?
Sharad Pawar accused Narendra Modi of silence on China encroachment
चीनच्या अतिक्रमणावर मोदींचे मौन; शरद पवार यांचा आरोप
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!

हेही वाचा – T20 WC : गंमत वाटेल, पण ‘हे’ क्रिकेटपटू भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून खेळलेत!

इम्रान खान यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघही भारताला विश्वचषकात हरवू शकलेला नाही. विशेष गोष्ट म्हणजे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसाठी हरवण्याचा सिलसिला १९९२ मध्ये सुरू झाला. त्यावेळी इम्रान खान कर्णधार होते. त्यानंतर टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला ७ वेळा पराभूत केले आहे. याशिवाय टी-२० विश्वचषकातही पाकिस्तानला भारताच्या हातून ५ वेळा पराभूत व्हावे लागले आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला खात्री आहे, की त्याचा संघ टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारताला हरवेल. ”आम्ही गेल्या तीन वर्षांपासून यूएईमध्ये क्रिकेट खेळत आहोत आणि इथल्या परिस्थितीची चांगली माहिती आहे, आम्हाला माहीत आहे की विकेट्स कशा असतील आणि फलंदाजाला कोणते बदल करावे लागतील. जो संघ सामन्याच्या दिवशी चांगला खेळेल तोच जिंकेल. मला वाटते की आम्ही जिंकू”, असे बाबरने म्हटले होते.