यंदाच्या टी-२० विश्वचषकासाठी महेंद्रसिंह धोनीची भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. आता भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी धोनीबाबत विधान केले आहे. धोनी काही प्रमाणात मदत करू शकतो, कारण मैदानात कामगिरी करण्याची जबाबदारी खेळाडूंवर असते, असे गावसकारांनी सांगितले. रविवारी सुपर-१२ टप्प्यात भारत पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या फॉरमॅटमध्ये विराट कोहलीचा संघ विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचेही गावसकरांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गावसकर म्हणाले, “मेंटॉर जास्त काही करू शकत नाही. स्वरूप वेगाने बदलते आणि होय, ड्रेसिंग रूममध्ये तयार होण्यास तो तुम्हाला मदत करू शकतो. गरज पडल्यास धोरण बदलण्यात तो तुम्हाला मदत करू शकतो. तो टाइम-आऊट दरम्यान फलंदाज आणि गोलंदाजांशी बोलू शकतो, त्यामुळे धोनीची नियुक्ती करणे ही चांगली चाल आहे, पण धोनी ड्रेसिंग रूममध्ये असेल आणि खेळाडूंना मैदानावर प्रत्यक्ष काम करावे लागेल. खेळाडू दडपण कसे हाताळतात यावर सामन्याचा निकाल निश्चित होईल.”

हेही वाचा – T20 WC: अरेरे..! अवघ्या ४४ धावांत नेदरलँड्सचा पालापाचोळा!

गावसकर यांना विश्वास आहे की टी-२० मधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने कोहलीवरील दडपण आता कमी होईल. ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही कर्णधार बनता, तेव्हा तुम्ही फक्त तुमच्याबद्दल विचार करू शकत नाही, त्याला एका फलंदाजाशी बोलावे लागते, जो वाईट टप्प्यातून जात आहे किंवा गोलंदाजाशी रणनीतींवर चर्चा करावी लागते. या सर्वांमध्ये कोणालाही गरजेनुसार लक्ष देता येत नाही. जेव्हा तुमच्यावर दबाव नसतो, तेव्हा तुम्ही तुमच्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकता. मला वाटते की टी-२० विश्वचषकानंतर विराटला जबाबदाऱ्यांचा विचार करण्याची गरज नाही.”

जागतिक स्पर्धांमध्ये बाद फेरीचे सामने जिंकण्यात अपयशाचे मुख्य कारण संघ निवड हे असल्याचे गावसकर यांनी निदर्शनास आणले. “भारताच्या फलंदाजीची कमकुवत बाजू पॉवरप्लेनंतर सातव्या षटकापासून १२ व्या षटकापर्यंत आहे. आम्ही त्या चार ते पाच षटकांत चांगली फलंदाजी करून ४० धावा करू शकलो तर खूप छान होईल. टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला पराभूत करणे कठीण नाही. होय, कसोटीत चित्र बदलके. पण टी-२० मध्ये कोणताही संघ आवडता नाही आणि कमी चुका करणारा संघ जिंकतो”, असेही गावसकरांनी म्हटले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup sunil gavaskar on mentor ms dhoni adn
First published on: 22-10-2021 at 23:46 IST