Ind Vs Aus: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात विराटने केली गोलंदाजी

कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीला गोलंदाजी करण्यास सांगितलं. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विराट कोहली वर्ल्डकपमध्ये गोलंदाजी करताना दिसला तर आश्चर्य वाटणार नाही.

Virat_kohli
(Photo- Twitter)

टी २० विश्वचषकासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून जोरदार सराव सुरु आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघात बदल दिसले. या सामन्याचं नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आलं होतं. कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीला गोलंदाजी करण्यास सांगितलं. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विराट कोहली वर्ल्डकपमध्ये गोलंदाजी करताना दिसला तर आश्चर्य वाटणार नाही. सराव सामन्यात प्लेईंग इलेव्हनचं बंधन नसल्याने विराट कोहलीने गोलंदाजी केली. विराटने दोन षटकं टाकत १२ धावा दिल्या.

हार्दिक पंड्या दुखापतीमुळे गेल्या काही सामन्यात गोलंदाजी करत नाही. त्यामुळे टीम इंडियाला एका गोलंदाजाची गरज भासत आहे. विराट कोहली वेगवान गोलंदाज असून पोकळी भरून काढण्यास मदत होईल. गेल्या काही दिवसांपासून दिग्गज टी २० मध्ये विराटला गोलंदाजी करण्याचा सल्ला देत आहेत.

विराट कोहलीने टी २० सामन्यातील १२ सामन्यात गोलंदाजी केली आहे. यात त्याने १९८ धावा देत एकूण ४ गडी बाद केले आहेत. २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने गोलंदाजी केली होती. या सामन्यात १ षटक आणि ४ चेंडू टाकत १५ धावा दिल्या होत्या. तसेच गडी बाद करण्यात यश मिळालं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup virat kohli bowling in warm up match against australia rmt

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या