“हे बघ माझ्याकडे खूप विकेटकिपर आहेत,” वर्ल्डकपआधी कोहलीचं बोलणं ऐकून ऋषभ पंतने लावला डोक्याला हात

“धोनीसारखा विकेटकिपर पुन्हा भारतीय संघाला मिळाला नाही,” कोहलीचं पंतला आव्हान

T20 World Cup, Virat Kohli, Rishabh Pant, MS Dhoni, Dubai
"धोनीसारखा विकेटकिपर पुन्हा भारतीय संघाला मिळाला नाही," कोहलीचं पंतला आव्हान

आयपीएलनंतर आता भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकपच्या तयारीत लागले आहेत. टी-२० संघात स्थान मिळालेल्यांमध्ये विकेटकिपर ऋषभ पंतही आहे. आयपीएलमध्ये दिल्लीचं नेतृत्व करताना ऋषभ पंतने केलेल्या कामगिरीचं सध्या सर्वांकडून कौतुक होत आहे. एकतर्फी फलंदाजी करत संपूर्ण सामन्याचं पारडं पालटण्याची क्षमता ऋषभ पंतमध्ये आहे. पण विकेटकिपर असल्याने त्याची नेहमी धोनीशी तुलना होत असते. नुकतंच कर्णधार विराट कोहलीनेही ऋषभ पंतला धोनीसारखा विकेटकिपर पुन्हा मिळाला नसल्याचं सांगत आव्हान दिलं आहे.

स्टार स्पोर्ट्सने टी-२० वर्ल्डकपच्या निमित्ताने विराट कोहली आणि पंतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दोघेही एकमेकांशी संवाद साधत असून यावेळी विराट कोहली पंतला बारतीय संघाकडे भरपूर विकेटकिपर असून वॉर्मअपमध्ये कोण चांगलं खेळतं ते पाहूयात असं सांगत आव्हान देत आहे.

T20 World Cup : टीम इंडियानं नवी जर्सी लाँच करताच रोहितवर खिळल्या नजरा; ‘ती’ कृती ठरलीय कौतुकास्पद!

व्हिडीओच्या सुरुवातीला कोहली पंतला सांगतो की, “ऋषभ टी-२० मध्ये षटकारच सामने जिंकून देतात”. यावर पंत म्हणतो की, “चिंता नसावी…मी रोज सराव करत आहे. भारतीय संघाला षटकार मारुन वर्ल्डकप जिंकवून देणाराही विकेटकिपरच होता”. ऋषभ पंतचा उल्लेख २०११ च्या वर्ल्डकपबद्दल आहे ज्यावेळी वानखेडेमध्ये धोनीने षटकार ठोकून भारताला अंतिम सामना जिंकवून देत इतिहास रचला होता.

हेही वाचा – T20 World Cup : टीम इंडियाचा ‘मेंटॉर’ बनलेल्या धोनीनं किती मानधन घेतलं?; BCCIचे जय शाह म्हणाले…

“हो पण भारताला माही भाईनंतर तसा विकेटकिपर मिळाला नाही,” असं कोहलीने म्हटल्यावर पंतही मी आहे ना असं म्हणतो. यावर कोहली त्याची गुगली घेत, “हे बघ माझ्याकडे खूप विकेटकिपर आहेत, बघूयात वॉर्मअपमध्ये कोण खेळतं”.

आयपीएलच्या वॉर्मअप सामन्यात १८ आणि २० ऑक्टोबरला भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरोधात खेळणार आहे. यानंतर २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. यानंतर, भारताचा सामना ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होईल. त्याच वेळी, ३ नोव्हेंबर रोजी, अबुधाबीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तिसरा सामना असेल.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर.

मार्गदर्शक: महेंद्रसिंह धोनी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup virat kohli challenges rishabh pant ahead mentioning ms dhoni sgy

ताज्या बातम्या