ICC T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावत असलेल्या महेंद्रसिंह धोनीने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. सामना संपल्यानंतर धोनीचा पाकिस्तानी क्रिकेटर्स सोबतचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. धोनीसमोर पाकिस्तानचे चार खेळाडू कर्णधार बाबर आझम, इमाद वसीम, शोएब मलिक आणि युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहनी उभे असल्याचे दिसले. धोनी त्यांच्यासोबत आपले अनुभव शेअर करतांना दिसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आयसीसीने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

आयसीसीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करतांना लिहले. “चर्चा आणि बाकी खूप साऱ्या गोष्टी बोलल्या जात असल्या तरी ही भारत-पाकिस्तान सामन्याचे हे खरे सत्य आहे”

सामन्यापूर्वी धोनी टीम इंडियासोबत मैदानावर दिसला होता. पाकिस्तानमध्येही धोनीची लोकप्रियता प्रचंड आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २००७ टी-२० विश्वचषक जिंकला आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात प्रथमच भारताला विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

एमएस धोनीच्या नेतृत्वात ७ वेळा पाकिस्तानविरुद्ध विजय

१९९२ च्या विश्वचषकात भारताने पहिल्यांदा पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर १९९६,१९९९, २००३, २००७ (दोनदा पराभ केला), २०११, २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१९ मध्ये परावभ केला. या सर्व विजयांमध्ये भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली ७ वेळा विजय मिळवला. त्याने ५ टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर २०११ आणि २०१५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला. याशिवाय, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक २०१९मध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता.