T20 Tri Series Final: महिला क्रिकेटमधील टी-२० तिरंगी मालिकेतील आज फायनल सामना खेळवला जात आहे. या मालिकेतील फायनल सामना आज (२ फेब्रुवारी) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात होत आहे. हा सामना बफेलो पार्क इस्ट लंडन येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघान हरलीन देओलच्या ४६ धावांच्या खेळीच्या जोरावर ४बाद १०९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेसमोर ११० धावांच लक्ष्य ठेवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतला होता. त्यानुसार भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. कारण भारतीय संघाला स्मृती मंधानाच्या (०) रुपाने पहिला धक्का बसला. तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या फक्त १ होती. त्याचबरोबर जेमिमाह रॉड्रिग्जदेखील (११) लवकर बाद झाली. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला.

त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि हरलीन देओलने संघाचा डाव सावरला. यो दोन फलंदाजांनी तिसऱ्या विकेट्साठी ४८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर हरमनप्रीत कौर २१(२२) धावांवर बाद झाली. भारतीय संघाकडून हरलीन देओल सर्वाधिक धावा केल्या. तिने ५६ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs AUS Test Series: दिनेश कार्तिक बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत; पोस्ट शेअर करत दिली माहिती

दक्षिण आफ्रिका संघाकडून गोलंदाजी करताना नॉनकुलुलेको म्लाबाने विकेट्स घेतल्या. तिने २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अयाबोंगा खाका आणि सुने लुसने प्रत्येकी एक विकेट घेतली. आता त्यांना विजयासाठी ११० धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20i tri series final the indian womens team has set a target of 110 runs to the south african team vbm
First published on: 02-02-2023 at 20:03 IST