scorecardresearch

Test Cricket: १४५ वर्षात जे घडलं नाही ते अवघ्या ५ दिवसात पाहायला मिळालं; चंद्रपॉल- ब्रॅथवेटने नोंदवला सर्वात अनोखा विक्रम

Test Cricket Record: कसोटी क्रिकेटचा इतिहास १४५ वर्षांचा आहे. दोन फलंदाज पाच दिवस फलंदाजीसाठी बाहेर पडले असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. क्रेग ब्रॅथवेट आणि तेजनारायण चंद्रपॉल यांच्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला गेला.

most unique world record in the history of 145 Test cricket
चंद्रपॉल- ब्रॅथवेट (फोटो- ट्विटर)

वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला कसोटी सामना पार पडला. हा सामना अनिर्णीत राहिला. १४५ वर्षांच्या कसोटी इतिहासात जे घडले नाही ते या सामन्यात घडले. बुधवारी पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अनोखा विक्रम रचला गेला. हा विक्रम क्रेग ब्रॅथवेट आणि तेजनारायण चंद्रपॉल हे पाचव्या दिवशी खेळायला उतरताच निर्माण झाला. त्या दोघांनी सलग पाच दिवस फलंदाजीसाठी उतरुन नवा विक्रम केला.

सामन्याच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ५१ षटकांचा खेळ होऊ शकला. ब्रेथवेट आणि तेजनारायन चंद्रपॉल ५५-५५ धावा करून नाबाद परतले. दुसऱ्या दिवशी पावसामुळे चहापानापर्यंत खेळ होऊ शकला नाही. यानंतर ब्रेथवेट आणि चंद्रपॉल डाव पुढे नेण्यासाठी उतरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजची धावसंख्या २२१/० अशी होती.

ब्रेथवेट ११६ आणि चंद्रपॉल १०१ धावा करून नाबाद परतला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ब्रॅथवेट १७१ धावांवर बाद झाला, तर चंद्रपॉल २०७ धावा करून नाबाद परतला. चौथ्या दिवशी झिम्बाब्वेने ९ बाद ३७९ धावांवर घोषित केला. त्यामुळे ब्रॅथवेट आणि चंद्रपॉल पुन्हा वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले आणि दोघेही नाबाद परतले. पाचव्या दिवशी दोघेही खेळपट्टीवर उतरताच हा एक अनोखा विश्वविक्रम रचला गेला.

हेही वाचा – BGT: ‘वहिनींनी घराबाहेर काढलं का?’ दिनेश कार्तिकने ‘तो’ प्रश्न विचारून केली मोठी चूक; आता होत आहे फजिती

सामन्याबद्दल बोलायचे तर, पहिल्या डावात वेस्ट इंडिजने ६ बाद ४४७ धावांवर डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने आपल्या पहिल्या डावात ९ बाद ३७९ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर वेस्ट इंडिजने आपला दुसरा डाव ५ बाद २०३ धावांवर घोषित केला. त्याचबरोबर झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात ६ बाद १३४ धावा केल्या. ज्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 09:35 IST
ताज्या बातम्या