scorecardresearch

टाटा खुली टेनिस स्पर्धा: पराभवातही मानस धामणेची प्रभावी कामगिरी

थेट प्रवेश मिळालेल्या पुण्याच्या १५ वर्षीय मानस धामणेला टाटा खुल्या महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

टाटा खुली टेनिस स्पर्धा: पराभवातही मानस धामणेची प्रभावी कामगिरी

पुणे : थेट प्रवेश मिळालेल्या पुण्याच्या १५ वर्षीय मानस धामणेला टाटा खुल्या महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. कारकीर्दीत प्रथमच एटीपी मालिकेतील मुख्य फेरीत खेळताना मानसच्या कौशल्याची कसोटी लागली. परंतु मानसने आपल्या खेळाची चुणूक दाखवून उपस्थितांना निश्चितपणे प्रभावित केले.

जागतिक क्रमवारीत ११५व्या स्थानावर असणाऱ्या मोहने मानसचा ६-२, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जागतिक मानांकन, शारीरिक तंदुरुस्ती आणि तंत्र अशा सगळय़ाच आघाडीवर सरस असणाऱ्या मोहला मानसने चांगली लढत दिली. रॅलीज खेळताना मानसची दमछाक झाली. मानसच्या फटक्यात ताकदीचाही अभाव होता. तरी मानसने कमालीची जिद्द दाखवली. दुसऱ्या सेटमध्ये मानसने चार गेमही जिंकल्या.

मानसच्या प्रतिकारामुळे मोहदेखील प्रभावित झाला होता. इतका कडवा प्रतिकार अपेक्षित नव्हता, असे मोहने लढतीनंतर कबूल केले.एटीपी मालिकेतील पहिल्याच मोठय़ा स्पर्धेत खेळताना दडपण आले होते. मात्र, पहिला गुण घेतल्यावर हे दडपण दूर झाले. लढतीत मला मुसंडी मारण्याची संधी होती. ती साधली असती तर लढत आणखी वेगळी झाली असती. माझ्या खेळाबाबत मी समाधानी आहे. हा अनुभव वेगळा होता. – मानस धामणे

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 03:41 IST

संबंधित बातम्या