टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : अर्जुनला विजेतेपद

अर्जुनने नऊपैकी साडेसहा गुणांची कमाई केली. या स्पर्धेत फक्त आर. प्रज्ञानंदविरुद्ध त्याने पराभव पत्करला़

अर्जुन ईरिगियासी

भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन ईरिगियासीने टाटा स्टील जलदगती बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले़  नवव्या आणि अखेरच्या डावात अर्जुनने लेव्हॉन अरोनियनला बरोबरीत रोखत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ही जलदगती स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.

अर्जुनने नऊपैकी साडेसहा गुणांची कमाई केली. या स्पर्धेत फक्त आर. प्रज्ञानंदविरुद्ध त्याने पराभव पत्करला़ परंतु ग्रँडमास्टर सॅम शँकलँड, ग्रँडमास्टर कार्तिकेयन मुरली, ग्रँडमास्टर परहम गॅघसूडलू, ग्रँडमास्टर ली क्वांग लिएम आणि आंतरराष्ट्रीय मास्टर आर. वैशाली यांच्याविरुद्ध विजय संपादन केले़

नवव्या फेरीत प्रज्ञानंद आणि मुरली यांच्यातील सामना बरोबरीत सुटला, तर विदित गुजराथीने शँकलँडशी बरोबरी साधली. परंतु बी. अधिबान आणि वैशाली यांनी अनुक्रमे लिएम आणि परहम यांच्याविरुद्ध पराभव पत्करला.

अरोनियन, प्रज्ञानंद आणि विदित यांच्या खात्यावर प्रत्येकी साडेपाच गुण जमा होते. परंतु अरोनियमला दुसरे, प्रज्ञानंदला तिसरे आणि विदितला चौथे स्थान मिळाले. कार्तिकेयनला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले़

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tata steel chess tournament champion to arjun akp

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या